Thursday, October 16, 2025
Google search engine
HomeUncategorizedजागतिक व्याघ्र दिनानिमीत्त विविध स्पर्धेचे आयोजन

जागतिक व्याघ्र दिनानिमीत्त विविध स्पर्धेचे आयोजन

ऑनलाईन रजिष्ट्रेशन करणे अनिवार्य
गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र अंतर्गत गोंदिया व भंडारा जिल्ह्याकरीता जागतिक व्याघ्र दिनानिमीत्त चित्रकला स्पर्धा, Reel Competition, Research talk/ Poster Presentation इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरीता गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील आवेदकांकडून 22 जुलै 2024 पर्यंत आवेदन स्विकारण्यात येतील. प्रशासनाच्या सोईकरीता ऑनलाईन रजिष्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. आवेदन फॉर्म ऑनलाईन पध्दतीने रजिष्ट्रेशन करण्याकरीता सोबत वरील तिन्ही स्पर्धेचे QR कोड उपलब्ध करुन देण्यात येत असून स्पर्धेकांनी सदर QR कोड स्कॅन करुन विशेष माहिती उपलब्ध करुन स्पर्धेत सहभाग घेण्याकरीता आपल्या नावाची नोंदणी करावी. तरी ‘ग्लोबल टायगर डे 2024’ निमीत्त विविध कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील सर्व इच्छुकांनी याची नोंद घ्यावी. अधिक माहितीकरीता www.nawegaonnagzira.com या वेबसाईटवर संपर्क साधावा. असे नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोलीचे उपसंचालक पवन जेफ यांनी कळविले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments