गोंदिया : गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध कायदा) 1994 सुधारित 2003 अंतर्गत जिल्हा दक्षता समितीची सभा जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आयोजित करण्यात आली. पीसीपीएनडीटी कायदा अंतर्गत जिल्हास्तरीय दक्षता पथक (Task Force) माहे एप्रिल 2025 पर्यंत झालेल्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला.यावेळी जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय लिंग गुणोत्तर दर टक्केवारी तसेच संबंधित आराखडयाचे सादरीकरण करण्यात आले तसेच कायद्याची गरज, कायद्यातील महत्त्वाची कलमे व नियम, हेतू याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सभेला मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरिश मोहबे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बालरोग तज्ञ डॉ.लिना धांडे,बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे सहाय्यक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पवन राऊत,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल,बीजीडब्ल्यु रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.सलील पाटील,जिल्हा माध्यम व विस्तार अधिकारी विजय आखाडे,जिल्हा आय.ई.सी अधिकारी प्रशांत खरात,तसेच डॉ.संगिता भोयर,डॉ.प्रणित पाटील,डॉ.ललित कुकडे,डॉ.विनोद चव्हाण,डॉ.निलेश जाधव,डॉ.कविश्वर किरसान,डॉ.अमित खोडनकर तसेच तालुका आरोग्य अधिकारी व शासकीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी घेतला दक्षता समिती सभेचा आढावा
RELATED ARTICLES