गोंदिया : तिरोडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असून, पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. खासदार श्री. प्रफुल पटेलजी यांच्या प्रभावी नेतृत्वावर व विकासात्मक विचारधारेवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत.
मागील काही दिवसांपासून तालुक्यातील विविध गावांमधून कार्यकर्ते मोठ्या उत्साहात पक्षप्रवेश करत असून आज जनसंपर्क कार्यालय, पाल चौक, गोंदिया येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते पक्षाचा दुपट्टा वापरून तिरोडा तालुकाक्यातील पं.स.चिखली क्षेत्रांतर्गत भिवापूर, मेंदीपूर, चिखली, खैरबोडी, खोडगाव येथील मुन्नीबाई कोहळे, गिताताई बिसेन, लता नेवारे, संजय उके, विनोद सिंग मेंदीकर, अनिल मेश्राम, रिता सूर्यवंशी, उज्ज्वल सूर्यवंशी, रवी टेभऱे, मोहन टेभऱे, अनिल रहांगडाले, हेतराम पटले, मनोहर ठोंबरे, शालिक पटले, राधेलाल हरिणखेडे, ओमप्रकाश पटले, रमेश बिसेन, अशोक नेवारे, हेमलता नेवारे, जितू पटले, अर्जुनी येथील उपसरपंच आशिष बन्सोड, ग्रामपंचायत सदस्य पवन बशीने, अरविंद बागडे, भाऊलाल पटले, कोमलेश्वरी अंबुले, मेघा चौहान, बबिता देशमुख, संगीता कनोजे, विशाल पटले, प्रमोद पटले, सुखदेव गुजर, आशिष बरयेकर, आशिष चौधरी, वेदांत चौहान, सुरेंद्र वासनिक, रतन देशमुख, आकाश ठाकरे तर सावरा येथील माजी सरपंच रामप्रसाद राऊत, शोभेलाल कोंबडे, सचिन राऊत, गौरीशंकर राऊत, वासुदेव नेरकर, महेंद्र राऊत, ज्ञानेश्वर उपरीकर, देवराव निनावे, पिपरिया येथील उपसरपंच सुरेंद्र लिल्हारे यांनी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणखी बळकट होत आहे. तालुक्यातील पक्षप्रवेशाच्या या लाटेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, राजलक्ष्मी तुरकर, योगेंद्र भगत, जगदीश बावनथडे, केवलभाऊ बघेले, राजूभाऊ ठाकरे, डॉ संदीप मेश्राम, मुन्ना बिंझाडे, अल्केश मिश्रा, राधेलाल बिसेन, घनेश्वर तिरेले, जगदीश मराठे, रुपेश तितिरमारे सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
तिरोडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जोरदार पक्षप्रवेश, खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास
RELATED ARTICLES