Sunday, September 8, 2024
Google search engine
HomeUncategorizedदत्त मंदिरात आयुष्यमान कार्ड योजना शिबिर

दत्त मंदिरात आयुष्यमान कार्ड योजना शिबिर

गोंदिया : स्थानिक छोटा गोंदिया येथील दत्त मंदीर परिसरात जनशक्ती बहु. सामाजिक संगठनच्या पुढाकाराने दोन दिवसीय मोफत आयुष्यमान भारत जन आरोग्य अभियान (आयुष्यमान कार्ड ) शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
संगठनेचे संयोजक तिर्थराज ते. उके यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिर आयोजित करण्यात आला होता. या शिबिरात जवळपास १0१ नागरीकांचे आयुष्यमान कार्ड बनविण्यात आले व २५0 नागरिकांनी प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेची माहिती घेतली. सदर शिबिरात प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ.जयंती पटलेयांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यमान योजना आँपरेटर इंद्रपाल चौरीवार यांनी नागरिकांना योजनेची माहिती दिली.
शिबिर यशस्वी करण्यासाठी दत्त मंदिर समितीचे पदाधिकारी मुनेश्‍वर (बंडू) ढोमने, गज्जु पंडीतकर, रामकिशन दमाहे तसेच जनशक्ती संगठनेचे पदाधिकारी अनिल शरणागत, अनिल ढोमने, भारती ब्राम्हणकर तसेच जनशक्ती संगठनेचे पदाधिकारी अनिल शरणागत, अनिल ढोमने, भारती ब्राम्हणकर ताई आदींने सहकार्य केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments