गोंदिया. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मुक्कामाची सोय व्हावीस या उद्देशाने येथील बाजार समितीच्या परिसरात शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत १ कोटी ५२ लक्ष ९१ हजार तीनशे सात रुपये मंजूर केले आहे. त्यामुळे लवकरच नव्या शेतकरी भवनाची निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती समितीच्या आवारात शेतकऱ्यांच्या सोयीकरिता शेतकरी भवनाची व्यवस्था व्हावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेअंतर्गत राज्यातल्या विविध कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन तथा जुन्या शेतकरी भावनांची दुरुस्ती करिता अनुदान देत आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव शेतकऱ्यांच्या सदर योजनेअंतर्गत पणन संचालक पुणे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे १५२.९१ लक्ष रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.बाजार समितीचे सभापत यशवंत परशुरामकर यांनी याकरीता आमदार इंजि.राजकुमार बडोले यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आहे.
दीड कोटीच्या निधीतून होणार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
RELATED ARTICLES