Sunday, September 8, 2024
Google search engine
HomeUncategorizedनागपुरच्या इंस्पायर संस्थे तर्फे विजय ठोकणे सन्मानित

नागपुरच्या इंस्पायर संस्थे तर्फे विजय ठोकणे सन्मानित

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उपस्थिती : दिव्यांगांच्या सर्वसमावेशक केंद्राचे उद्घाटन
गोंदिया : दिव्यांग मुलांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांच्या मोफत शस्त्रक्रिया केल्यानंतर निरंतर थेरपी सेवा व पुनर्वसन करण्यासाठी नागपुर येथिल बाल अस्थिरोग तज्ज्ञ डॉ विराज शिंगाडे यांनी हिंगणा नागपुर यांच्या इंस्पायर या सर्व समावेशक केंद्राचे उद्घाटन देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिनांक 9 एप्रिल रोजी सकाळी पार पडले यावेळी गेल्या विस वर्षा पासुन गोंदिया जिल्ह्यातील दिव्यांग मुलांना सेवा देणारे समग्र शिक्षा विभागाने जिल्हा समन्वयक यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे, कर्नाटक चे खासदार डी. विरय्या, इंस्पायर च्या उपाध्यक्ष डॉ रश्मी शिंगाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे नियोजित प्रमुख पाहुणे राज्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यस्ततेमुळे हजर राहू शकले नाही.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी दिव्यांग बांधवांना समानतेची वागणूक देण्याची जबाबदारी सर्व समाजाची असल्याचे मत व्यक्त करून डॉ विराज शिंगाडे यांनी स्थापन केलेल्या केंद्राचे तोंडभरून कौतुक केले. हा सन्मान झाल्याबद्दल जिल्हा समन्वयक विजय ठोकणे यांनी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील व शिक्षणाधिकारी प्राथमिक डॉ महेंद्र गजभिये यांचे मार्गदर्शन व जिल्हयात कार्यरत समावेशीत शिक्षण तज्ञ तथा रिसोर्स टीचर यांच्या मेहनतीचे फळ असल्याचे मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments