गोंदिया : राज्याचे वित्त व पाटबंधारे विभागाचे माजी मंत्री तथा खासदार महादेवरावजी शिवणकर यांच्यावर आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. काळ सकाळी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले होते.येथील साकरीटोला घाट, सालेकसा रोड आमगाव येथे शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी शासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड या उपस्थित होत्या. त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
श्री शिवणकर हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. गोंदिया जिल्ह्याची निर्मिती त्यांच्या कार्यकाळात झाली असून त्यांना जिल्ह्याचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते. ते राज्याचे पाटबंधारे मंत्री असताना गोंदिया जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. जिल्ह्यातील सिंचनाच्या समस्या सोडविण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता.आज त्यांच्या पार्थिवाचे दर्शन आमदार डॉ परिणय फुके,आमदार विनोद अग्रवाल,माजी खासदार डॉ खुशाल बोपचे, मधुकर कुकडे , सुनिल मेंढे ,माजी आमदार खोमेश रहागंडाले,केशवराव मानकर,लांजीचे आमदार कुराहे,नरेश माहेश्वरी,अमर वराडे,आमदार नाना पटोले,माजी आमदार दिलीप बनसोड,माजी खासदार अशोक नेते,अशोक लंजे यांच्यासह जिल्ह्यातील जनतेने घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
माजी मंत्री तथा खासदार महादेवराव शिवणकर यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार
RELATED ARTICLES