Monday, September 16, 2024
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्र उभारणीसाठी लोकचळवळ गरजेची : अप्पर पोलीस अधीक्षक बनकर

राष्ट्र उभारणीसाठी लोकचळवळ गरजेची : अप्पर पोलीस अधीक्षक बनकर

पवनी/धाबे येथे ‘मेरी मिट्टी मेरा देश’ कार्यक्रम उत्साहात
गोंदिया. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी इंग्रजांविरुद्ध लढा उभारला तेव्हा सविनय कायदेभंग आंदोलन लोकचळवळ बनले होते त्यामुळे राष्ट्र उभारणीसाठी लोकचळवळ गरजेची आहे, असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांनी (ता.14) केले.
तालुक्यातील पवनी /धाबे येथे आयोजित राष्ट्रीय कार्यक्रम, ‘माझी माती माझा देश ‘ या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच पपीता नंदेश्वर या होत्या. मंचावर नवेगावबांधचे ठाणेदार संजय पांढरे, उपसरपंच पराग कापगते, ज्येष्ठ नागरिक सुनीता टेम्भूरणे, शिवाजी कमरो, विठ्ठल आदमने,हरी इष्कापे, सर्व मुख्याध्यापक आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
श्री बनकर यांनी माझी माती माझा देश या कार्यक्रमाची जोरदार स्तुती करून हा एक अभिनव उपक्रम असल्याचे सांगितले.पुढे बोलताना ते म्हणाले की, आपलं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी शुक्ष्म निरीक्षणाची गरज असते. भारत जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यन्त विस्तीर्ण असा पसरला आहे. तेव्हा आपल्या राष्ट्रावर प्रेम करण्यासाठी अश्या कार्यक्रमांची नितांत गरज आहे असा युक्तिवाद त्यांनी केला. भारत माझा देश आहे ही प्रतिज्ञा म्हणजे सर्वच विविध फुलांना एकाच माळेत गूंफुंण त्यांची जी माळ तय्यार होते त्या प्रमाणेच आपला देश आहे. असे ते म्हणाले.
यावेळी शीलाफलकाचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय शपथ वदवून घेण्यात आली. श्री बनकर यांनी पवनी /धाबे इथल्या मूठभर मातीचे कलश सरपंच श्रीमती नंदेश्वर आणि उपसरपंच कापगते यांच्या स्वाधीन केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आला. दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि पादत्राने वितरित करण्यात आले. हे साहित्य किरण मोरे यांनी उपलब्ध करून दिली.याप्रसंगी देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. हा कार्यक्रम ग्रामपंचायत पवनी /धाबे आणि गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक श्री बनकर आणि पवनी /धाबे एओपीचे पोलीस उपनिरीक्षक जनाब अजरुद्दीन शेख यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उपसरपंच श्री कापगते यांनी, संचालन ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर यांनी आणि आभार श्री शेख यांनी मानले. यावेळी गावातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments