Thursday, June 19, 2025
Google search engine
HomeUncategorizedविद्यालयावरील सायकल वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे, डॉक्टर राधाकृष्ण हायस्कूल कनेरी/केशोरी येथील प्रकार

विद्यालयावरील सायकल वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे, डॉक्टर राधाकृष्ण हायस्कूल कनेरी/केशोरी येथील प्रकार

पत्रकार परिषदमध्ये मुख्याध्यापक व अध्यक्ष यांनी खंडन केले
गोंदिया : मानव विकास सायकल वाटप योजनेअंतर्गत विद्यालयामध्ये ये जा करण्यासाठी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल मिळत असते .या योजनेअंतर्गत डॉक्टर राधाकृष्णन विद्यालय कनेरी/ केशोरी या विद्यालयाने शैक्षणिक शस्त्र २०२३-२४ मध्ये दिनांक 22- 9 -2023 ला 13 पात्र विद्यार्थ्यांची यादी गटशिक्षणाधिकारी गटसाधन केंद्र अर्जुनी मोर यांच्याकडे पाठविली. सदर पात्र विद्यार्थ्यांची यादीमध्ये अंजली मेश्राम, अपर्णा मंडल ,दिशा मंडल, भाविका नेवारे ,दीपिका कोवे, गौरी काटेंगे ,प्रतिज्ञा सिडाम, प्रतिज्ञा नेवारे, रूपाली शहारे, नयना मरसकोले ,साक्षी मेश्राम, दिशा मेश्राम, प्राची लोथे, या विद्यार्थ्यांना सायकली मंजूर झालेल्या होत्या. दिनांक 22-1- 2024 ला 3500 रुपये प्रति विद्यार्थिनी या दराने विद्यालयाच्या खात्यावर 45500 रुपये अनुदानाचा पहिला टप्पा जमा झालेला होता. सदर रक्कम दिनांक 5-2- 2024 ला विद्यार्थिनीच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. पालकांनी आपल्या पाल्याना सायकल विकत घेऊन दिली .अनुदानाचा दुसरा टप्पा दिनांक 17 -5 -2024 ला विद्यालयाच्या खात्यावर जमा झाला. विद्यालय मार्फत पात्र विद्यार्थिनींना पंधराशे रुपये याप्रमाणे चेक क्रमांक 19 45 76 ते 19 45 88 चे देण्यात आले.त्या रक्कमेतून पालकांनी सायकल विक्रेत्याची उर्वत रक्कम अदा केली. सर्व पालकांनी विद्यालयामध्ये सायकल खरेदी बिल सादर केले .दुसऱ्या दिवशी विद्यालयाचे मुख्याध्यापक भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यालयातील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सायकलचे वाटप करण्यात आले.
मात्र सोशल मीडियाद्वारे संस्थेचे अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्यावर केलेला आरोप बिनबुडाचा आहे. या विद्यालयातील अध्यक्ष वडिलांच्या जयंती दिनानिमित्त सन 19 85- 86 पासून त्यावेळेस शासनाकडून साध्या पुस्तका सुद्धा मिळत नव्हत्या.त्यावेळी वडीलधारी मंडळी ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांना स्वतः पुस्तके देत होते .त्यांनी दरवर्षी परिसरातील विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप केले.आजपर्यँत मोफत दीडशेच्या वर सायकल सुद्धा वाटप केले आहे. जी व्यक्ती प्रामाणिकपणे ग्रामीण भागातील आदिवासी बंधूंची सेवा करतात.ते भ्रष्टाचार कसे करतील हा प्रश्न निर्माण झालेला आहे.
पत्रकार परिषद मध्ये विद्यालयाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी विद्यालयात पत्रकार परिषदेत खुलासा केला. मुख्याध्यापकाकडून माहिती व सहनिशा केली. या ठिकाणी कोणताच भ्रष्टाचार झालेला नाही. हे सर्व आरोप बिन बुडाचे आहेत. मी जिल्हा परिषदेतील 85 लाखाच्या भ्रष्टाचाराचि उकल केल्यामुळे सूडबुद्धीने आरोप केले असावेत . असे प्रतिपादन केलेले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments