Thursday, April 30, 2026
Google search engine
HomeUncategorizedसारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ, गणनेत 36 सारसांची नोंद

सारस पक्ष्यांच्या संख्येत वाढ, गणनेत 36 सारसांची नोंद

गोंदिया : जिल्ह्याच्या नैसर्गिक संपदेत भर घालणाऱ्या सारसांच्या संख्येने यंदा सुखद धक्का दिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल १३ सारस पक्ष्यांची वाढ झाली आहे. सारस संवर्धनासाठी सर्वच स्तरावरून प्रयत्न होत असल्याने सारस संवर्धन होत असल्याचेदिलासादायक चित्र आहे. यंदा झालेल्या सारस गणनेत गोंदिया वनपरिक्षेत्रात तब्बल ३६ सारस पक्ष्यांची नोंद झाली आहे.

गोंदिया वनपरिक्षेत्रात सन २०२३ मध्ये सारसांची संख्या १२ होती. ती सन २०२४ मध्ये २३ झाली. गोंदिया वनपरिक्षेत्राधिकारी दिलीप कौशिक व त्यांच्या चमूने केलेल्या विशेष प्रयत्नामुळे ही संख्या तब्बल ३६ पोहचली आहे. सोमवारी (दि.१६) पहाटे ५ ते सकाळी ९ वाजता दरम्यान सारस गणना करण्यात आली. यात जिल्ह्यातील ४० स्थळांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी २७ स्थळ हे गोंदिया वनपरिक्षेत्रातील आहेत. पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण आणि संवर्धन यासाठी सातत्याने कार्यरत सेवा संस्था व वनविभागासोबत मिळून अन्य स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने सारस गणनेचे कार्य पारंपारिक आणि शास्त्रीय पद्धतीने केले. सारस पक्ष्यांच्या वावर असलेल्या ठिकाणावर सकाळी ५ ते ९ वाजतापर्यंत ही गणना करण्यात आली.

६ शेतकऱ्यांना प्रत्येकी २५ हजारांचे प्रोत्साहन

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात सारसने अंडी घातली त्या शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान होऊ नये यासाठी नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्प फाऊंडेशनने दीड लाख रूपये देऊन शेतकऱ्यांना मदत केली. शेतकरी सारस पक्ष्यांचे संवर्धन करतील यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला २५ हजार रूपये प्रोत्साहनपर देण्यात आले. मागील वर्षी ६ शेतकऱ्यांच्या शेतात सारसने अंडी घातली होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments