Sunday, September 8, 2024
Google search engine
HomeUncategorizedहनुमान जयंतीनिमित्त परसवाडा सर्वधर्म सामुहिक विवाह सोहळ्यात ७ जोडी विवाहबद्ध

हनुमान जयंतीनिमित्त परसवाडा सर्वधर्म सामुहिक विवाह सोहळ्यात ७ जोडी विवाहबद्ध

गोंदिया : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अनुसरून कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता, कर्जबाजारी न होता, सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या उपवर मुला-मुलींची लग्न लावून देणे हा सर्वोत्तम उपाय असून ती काळाची गरज झाली आहे असे प्रतिपादन तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी केले. परसवाडा त.तिरोडा येथे हनुमान जयंतीनिमित्त सन २०११ पासून दरवर्षी सर्वधर्म सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येतो. परंतु मागील ३ वर्षापासून कोव्हीडमुळे सदर कार्यक्रम झालेला नव्हता. यावर्षी हि परंपरा कायम ठेवत हनुमान देवस्थान समिती परसवाडातर्फे सर्वधर्म सामुहिक विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात ७ जोडप्यांनी सहभाग दर्शविला. या विवाह सोहळ्यात प्रामुख्याने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, जि.प.सदस्य चत्रभूज बिसेन, पवन पटले, माजी सभापती योगेंद्र भगत, प.स.उपसभापती हुपराज जमाईवार,मंदिर समिती अध्यक्ष मुकेश भगत, सरपंच उषा बोपचे, वसंत भगत, उपसरपंच मनिराम हिंगे, गोंडमोहाडी सरपंच दुर्गा शरणागत, खैरलांजी सरपंच सचिन कडव, पिपरिया सरपंच रिषभ मिश्रा, किसान आघाडी उपाध्यक्ष मनोहर बुद्धे, डोलीराम भगत, सरपंच महेश पटले, अर्जुनी सरपंच सुनीता रहांगडाले व गावकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments