गोंदिया : शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘जत्रा शासकीय योजनांची – सर्व सामान्यांच्या विकासाची’ हे अभियान गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथे बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या दरम्यान राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयाचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी एका छताखाली एकत्र येऊन विविध योजनांचा लाभ मिळवून देणार आहेत. सदर बाबतीकरीता लागणारे शुल्क हे शासकीय शुल्क असून अर्जदारास शासकीय शुल्क जे काही असतील ते भरना करावी लागेल. असे तहसिलदार गोंदिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
10 मे रोजी रावणवाडी येथे ‘शासकीय योजनांची जत्रा’
RELATED ARTICLES