भजेपार ग्राम पंचायतीचा उपक्रम, 183 गरजूंना मोफत चष्मे वाटप
सालेकसा : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्व निमित्ताने ग्राम पंचायत कार्यालय भजेपार तर्फे सोमवार, दि.10 एप्रिल 2023 रोजी मोफत नेत्र तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा वाटप तथा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराला रुग्ण आणि ऐच्छिक रक्तदात्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या समाजोपयोगी उपक्रमाबद्दल लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
नागपूर येथील महात्मे नेत्रपेढी रुग्णालयाच्या नेत्र तज्ञ डॉक्टरांच्या टीमने 349 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली. दरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्यावरून 183 गरजू लाभार्थ्यांना ग्राम पंचायत भजेपारच्या वतीने मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तपासणी दरम्यान मोतीबिंदू चे सुमारे 124 रुग्ण आढळले.त्यांची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून महात्मे नेत्रपेढी रुग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
त्यांच्यासाठी निवास, भोजन, प्रवास आदी सर्व सुविधा पूर्णतः मोफत राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. सरपंच चंद्रकुमार बहेकार, उपसरपंच कुंदा ब्राह्मणकर, सचिव रितेश शहारे, ग्रा.पं. सदस्य राजेश बहेकार, रेवतचंद बहेकार, आत्माराम मेंढे, रवीशंकर बहेकार, मनीषा चुटे, सरस्वता भलावी, आशा शेंडे, ममता शिवणकर यांच्या पुढाकारातून सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले.आरोग्य उपकेंद्राचे सीएचओ डॉ. दिनेश कटरे, आरोग्य सेविका विद्या बोहरे, आशा सेविका रामिता ब्राह्मणकर, विणू खांडवाये, ममता बोहरे, ज्योती चुटे आदींचे सहकार्य लाभले.शिबिराला पंचायत समिती सालेकसा चे उपसभापती संतोष बोहरे यांनी भेट दिली. लाभार्थ्यांनी ग्राम पंचायतीचे आभार मानले आहे.
40 रक्तदात्यांचे स्वैच्छिक रक्तदान
शासकीय मेडीकल कॉलेज गोंदिया येथील रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले यात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शाळा समितीचे अध्यक्ष टेकचंद बहेकार, सदस्य रेवत मेंढे, रोजगार सेवक गोपाल मेंढे, विनोद ब्राह्मणकर,प्रमोद बहेकार, संजय चुटे, मंगेश चुटे, हंसराज बहेकार, रमेश बहेकार, लोकेश चुटे, हेमंत चुटे, भुमेश्वर मेंढे, विक्की मेंढे, अखिलेश बहेकार,अतुल मेंढे, अमित ब्राह्मणकर, दागो फुंन्ने, अभिमन्यू तावाडे कृष्णा शिवणकर, विक्की महारवाडे, नंदकिशोर कठाने, भीमराज बहेकार, मुकेश पाथोडे, कमलेश मेंढे, शैलेश शेंडे सहित गावातील नागरिकांनी भरभरून सहकार्य केले.