एफटीके किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी मोहीमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ
गोंदिया : जिल्ह्यातील पाण्याची गुणवत्ता तपासणी योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी सर्व ग्रामपंचयातीला एफटीके किट पोहचविण्यात आलेल्या आहेत. कीटचा वापर करुन दिलेल्या वेळापत्रकानुसार नियमित स्त्रोताची पाणी गुणवत्ता तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ मुरुगानथम एम.यांनी केले.
एफटीके किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासणी मोहीमेचा जिल्हास्तरीय जनजागृती अभियानाचा शुभारंभ सीईओ मुरुगानथम एम. यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पाण्याच्या दुषीत आढळेलेल्या स्त्रोतावर त्वरित कार्यवाही करून पिवळे कार्ड प्राप्त ग्राम पंचायतला भेटी देऊन ग्रीन कार्ड मध्ये रुपातरीत करण्याचे निर्देशही जिल्हा परिषदेचे सीईओ मुरुगानथम एम.यांनी यावेळी दिले.
जिल्हा परिषदेत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात जिल्ह्यास्तरीय पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण अंतर्गत आज (या. २८) बैठक पार पडली. बैठकीला पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक फरेन्द्र कुतीरकर, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सुमित बेलपत्रे, उपविभाग यांत्रिकीचे उपअभियंता रविंद्र मोरे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. निरंजन अग्रवाल, जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या रसायणी भाग्यश्री सोनी, भूजल सर्वेक्षण विभागाचे प्रदीप शरणागत, पाणी गुणवत्ता तज्ञ मुकेश त्रिपाठी, जिल्हा कक्षातील सर्व सल्लागार आणि दूरस्थ प्रणालीद्वारे सर्व गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी आरोग्य, बीआरसी उपस्थित होते.
मोहीम अंतर्गत रासायनिक व जैविक क्षेत्रीय तपासणी संचाद्वारे पाणी नमुने तपासणी करिता जनजागृती अभियान राबविणे बाबत केंद्र शासनाच्या सूचना नुसार गावस्तरावर पाणी तपासणी करिता निवडण्यात आलेल्या पाच महिलांची डब्ल्यूक्यूएमआयएस या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर माहिती अद्यावत करणे, एफटिके तपासणीचे निष्कर्ष पोर्टलवर नोंदवणे करिता आशा वर्कर चे लॉगिन आयडी अद्यावत करणे, प्रत्येक गावातील शाळा, अंगणवाडी, किमान दोन घरगुती नळ जोडणी यांच्या पिण्याच्या पाण्याची तपासणी करणे, पिवळे कार्ड असलेल्या ग्रामपंचायत ची रूपांतर ग्रीन कार्ड मध्ये करणे करीता या मोहिमेमद्धे ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्या समन्वयाने जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायती अंतर्गत ८६८ गावातील प्रत्येक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोताचे एफटिके द्वारे परीक्षण करणे आवश्यक असून या मोहिमेत सर्व शासकीय यंत्रणांनी सहभाग नोंदवून सर्व स्त्रोतांची तपासणी करण्याचे आवाहन प्रकल्प संचालक फरेन्द्र कुतीरकर यांनी केले आहे.
राज्यामध्ये फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून गावातच पाणी गुणवत्ता तपासणी मोहीम राबविली जात आहे. २ ते ७ जून दरम्यान ही मोहीम ग्रामपंचायत स्तरावर राबवण्याचे नियोजन आहे. सदर मोहीम यशस्वीपणे राबवण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानथम एम यांनी केले आहे. यामध्ये सर्व संबंधित विभाग पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, ग्रामपंचायत विभाग, शिक्षण विभागाने सक्रीय सहभागी होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोहिमे अंतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या ५ महिलांची पडताळणी करणे, महिलांच्या पाणी गुणवत्ता विषयक एफटीके प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे, गावात आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांना एफटीकेद्वारे पाणी तपासण्याचे प्रात्यक्षिक देणे, आठवी ते दहावी मधील विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळ जोडण्या मधील पाणी नमुने तपासणी करणे, डब्ल्यू क्यु एमआयएस पोर्टल वरील नोंदी घेणे, नळ पाणीपुरवठा योजना स्त्रोत, घरगुती नळ जोडण्या, शाळा अंगणवाड्यांची पाणी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक एफटीके संचाचे वाटप करणे, स्थानिकांना पाणी गुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे यादरम्यान सांगितले जाणार आहेत. याचे सूक्ष्म नियोजन प्रकल्प संचाल फरेन्द्र कुतीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार पाणी गुणवत्ता सल्लागार
मुकेश त्रिपाठी यांनी मानले.