स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
गोंदिया : 17 आगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पो. ठाणे रावणवाडी परिसरात अवैध धंद्यांवर रेड, गुन्हेगार शोध, व गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पथकास गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की, चंगेरा गावाकडून तेढवा मार्गे जनावरें भरलेला ट्रक येत आहे अश्या मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे पो. स्टे. रावणवाडी परिसरातील मौजा मंडीयाटोला चौक येथे नाकाबंदी लावली असताना रात्री 22.15 वा. च्या सुमारास मौजा तेढवा कडून येणारे एक ट्रक येताना दिसला त्या ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक मागेच थांबवून रात्रीचा अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. त्या संशयित ट्रकच्या मागील डाल्याची पाहणी केली असता, टाटा कंपनी चे ट्रकमध्ये 9 म्हशी, व 8 रेडे असे एकूण 17 जनावरे किंमत 3,40,000/- रू. अवैधरीत्या निर्दयतेने चाऱ्यापाण्याविना कोंबून बंदिस्त केलेल्या स्थिती आढळून आल्याने ट्रक, आणि जनावरे, असा एकूण किंमती 18 लाख 40 हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेवून जप्त करण्यात आला.
निर्दयतेने बंदिस्त 17 गोवंशीय जनावरे (म्हशी व रेडे) यांची सुटका करून सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांच्या चारा- पाण्याची व्यवस्था व्हावी याकरीता कोरणी येथील गौशाळेत दाखल करण्यात आलेली आहेत.
सदर प्रकरणी फरार आरोपी चालक- मालक अजित हंसराज सहारे,रा. काटी, ता.जि. गोंदिया याचेविरुध्द पोलीस ठाणे रावणवाडी येथे प्रान्यांना निर्दयतेने छळवनुक प्रति.अधि. सह कलम महा. पशु संवर्धन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई पोलीस ठाणे रावणवाडी पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक,गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर, यांचे निर्देश सूचना प्रमाणे, आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात पोउपनि महेश विघ्ने, सहा.फौ. मधुकर कृपान, पोहवा. सोमेंद्रसिंह तुरकर, तुलशीदास लुटे, चापोहवा. लक्ष्मण बंजार, पो.शि. संतोष केदार यांनी केलेली आहे.
17 जनावरांची सुटका, 18.40 लाखांचा मुद्देमाल जप्त
RELATED ARTICLES