प्रतिनिधि।
गोंदिया। रामनगर पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्हा क्र. 10/2011 कलम 363, 366, 34 भारतीय दंड संहिता च्या गंभीर गुह्यावर सन 2012 पासून फरार आरोपी धम्मदिप उर्फ धम्मा कमल खोब्रागडे ला अटक करण्या करिता वेळोवेळी वरिष्ठांचे दिशा निर्देश प्राप्त झाले परंतु सदर आरोपी हा मिळून येत नव्हता.
फरार पाहिजे आरोपीबाबत पोलीस अधीक्षक गोंदिया यांनी जिल्ह्याचा आढावा घेऊन स्थानिक गुन्हे शाखेस याबाबत आदेशित करुन फरार पाहिजे आरोपींचे अटके बाबत सूचना केल्या होत्या. या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जिल्ह्यातील फरार पाहिजे आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करण्याकरीता शोध मोहीम राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशान्वये वरील गुन्ह्यातील फरार आरोपीचे अटके बाबत शोध सुरू होता व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे प्रयत्न सुरू होते. वारंवार प्रयत्न करून सुध्दा सदर आरोपी हा मिळून येत नव्हता. त्यामुळे सदर आरोपीच्या वास्तव्य, मो. क्रमांक बाबत गुप्त बातमीदार कडून सविस्तर माहिती गोळा करण्यात येवुन आज रोजी आरोपीचे मोबाईल क्रमांकावरून त्याचे सध्याचे वास्तव्य संबंधात तांत्रीक विश्लेषण करण्यात आले.
आरोपी हा पो.स्टे. रामनगर हद्दीतील कुडवा येथे त्याचे राहाते घरी असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने आरोपीस त्याचे राहते घर कुडवा येथून ताब्यात घेण्यात आले. त्याचेबाबत खात्री करून त्यास विश्वासात घेवून गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवून गुन्हा केल्या पासून गोंदीया जिल्हयातून फरार झाल्याचे सांगीतले.
आरोपी नामे धम्मदिप उर्फ धम्मा कमल खोब्रागडे वय 35 वर्षे रा. वार्ड क्र. 4, बौद्ध विहार जवळ, गोंदीया यास पुढील कायदेशीर कारवाई होणेस पोलीस ठाणे रामनगर पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले.
सदरची उल्लेखनीय कामगीरी वरिष्ठांचे निर्देश व आदेशान्वये पो. नि. स्था. गु. शा. दिनेश लबडे , यांचे मार्गदर्शनाखाली पो. उप.नि.महेश विघ्ने, पोलीस अंमलदार पो.हवा. तुलसीदास लुटे, राजेंद्र मिश्रा, पो. शि. संतोष केदार यांनी केली.