बाबा महाकालचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव थाटात
गोंदिया : २२ फूट उंचीच्या बाबा महाकालच्या भव्य मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव येथील कृष्णपुरा वॉर्डातील अंडरग्राउंड रोडलगतच्या हनुमान मंदिर परिसरात सोमवारी (दि.१) मोठ्या थाटात पार पडला. सहा दिवसीय प्राणप्रतिष्ठा महोत्सवात दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते व त्यात हजारो भाविकांनी उपस्थिती लावून लाभ घेतला.
येथील जय श्री महाकाल सेवा समिती व महिला सेवा समितीच्यावतीने अंडरग्राउंड रोडवरील हनुमान मंदिरासमोरच बाबा महाकाल यांच्या २२ फूच उंचीच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव २६ डिसेंबरपासून आयोजित करण्यात आला होता व नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि.१) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
यामध्ये १५१ जोडप्यांनी भाग घेतला व त्यांना गाठजोड समितीच्या वतीने प्रदान करण्यात आले. महोत्सवांतर्गत दररोज जागरण, पूजन, रुद्राभिषेक आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते व त्यात 31 डिसेंबर रोजी बाबा महाकालचे नेत्र उघडून सोमवारी (दि.१) मुख्य प्राणप्रतिष्ठा पूजा पार पडली. यासाठी २१ पंडितांनी मुख्य पूजेत भाग घेतला. यानिमित सायंकाळी महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाआरतीचा माजी आमदार राजेंद्र
जैन, शिवसेना जिल्हा प्रमुख पंकज यादव, मोक्षधाम
समितीचे देवेश मिश्रा व बंटी मिश्रा, नर्मदा भजन मंडळाचे अजय यादव आदींनी लाभ घेतला. उत्सवात यादव चौक समिती, शीतला माता समिती, जिल्हा अहिर यादव समाज, नर्मदा भजन मंडळ, बढ़ते कदम समिती, एक पहल समिती, सचखंड दरबार समिती, सिंधी समाजाच्या विविध समित्या, चांदनी चौक दर्गा मंदिर समिती, खरोबा माता मंदिर समिती, उत्तम यादव समिती, कृष्ण मंदिर समिती, विठ्ठल मंदिर समिती, उडिया मंदिर समिती, संत पु. घांसीदास बाबा समिती यांच्यासह अन्य विविध समिती पदाधिकारी व सदस्यांनी भाग घेऊन लाभ घेतला.