11.24 लाखांचा मुद्देमाल जप्त
गोंदिया : देवरीकडून नागपूरकडे 31 जनावरांची निर्दयतेने कोंबून वाहतूक करणाºया एका ट्रकला देवरी पोलिसांनी पकडले. ही कारवाई 8 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. पोलिसांनी 31 जनावरे किंमत 1 लाख 24 हजार व ट्रक किंमत 10 लाख रुपये असा एकूण 11 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनात मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणेदार प्रविण डांगे, पोलिस हवालदार वसंता देसाई, हिरासिंग कनपुरीया, पोलिस नायक पंकज पारधी, पोलिस शिपाई अरविंद पातोडे यांनी मरामजोब टी पार्इंटवर बंदोबस्त वाढविला. दरम्यान, देवरीकडून नागपुरकडे एमएच 40, एके 3933 क्रमांकाचा ट्रक अडविला. ट्रक चालकाला विचारले असता त्याने आपला नाव कुंदन विदेशीलाल शहारे (30) रा. भन्ते आनंद, कौशल्यानगर, कामठी रोड नागपूर असे सांगितले. वाहनाची पाहणी केली असता ट्रकमध्ये एकूण 31 जनावरे निर्दयतेने कोंबून वाहतूक करताना आढळले. पोलिसांनी 31 जनावरे किंमत 1 लाख 24 हजार व ट्रक किंमत 10 लाख रुपये असा एकूण 11 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त केला व आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रविण डांगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार वसंता देसाई करीत आहेत.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219