Tuesday, April 23, 2024
Google search engine
HomeUncategorized4 उमेदवारी अर्ज मागे, 18 उमेदवार रिंगणात

4 उमेदवारी अर्ज मागे, 18 उमेदवार रिंगणात

लोकसभा निवडणूक : भाजपा विरूद्ध काँग्रेस सरळ लढत
गोंदिया/भंडारा : भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात आज 30 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्ह्यात राष्ट्रिय पक्षासहित एकूण 22 उमेदवारी अर्ज होते. मात्र आज चार उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
त्यामुळे आता एकून 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात मुख्य लढत प्रशांत पडोळे काँग्रेस विरुद्ध सुनील मेंढे भाजपा अशीच राहणार आहे. तर दूसरीकडे भाजपमधून बंडखोरी करत बीएसपी कडून उमेदवारी मिळालेल्या संजय कुंभलकर हे देखिल जातीय समीकरनामुळे व भाजपचे किती मत आपल्याकडे वळविण्यात यशस्वी होतात त्यावर आता लक्ष लागले आहे. महत्वाचं म्हणजे वंचित कडून संजय केवट यांना उमेदवारी असली तरी या निवडणूकीत भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघात वंचीतला जनाधार नसल्याचे चित्र सध्यातरी पहायला मिळत आहे. त्यामुळें सरळ लढत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशीच पहायला मिळणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments