तिरोडा पोलिसांचा संत रविदास वार्डात छापा
गोंदिया : तिरोड़ा पोलीस स्टेशन अंतर्गत आगामी होणाऱ्या होळीच्या सणानिमित्त तिरोडा शहरातील संत रविदास वार्ड येथे अवैध दारूबाबत छापा मारण्यात आला. यात तब्बल 4 लाख 80 हजार रुपयांचा सडवा मोहफुल जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवार, 2 मार्च रोजी करण्यात आली.
संत रविदास वार्डात धाड घातली असता १) तौशिफ सलीम पठान २२ पोतड्या सडवा किंमत ८८,००० रूपये, २) सपना संजय बरियेकर १४ पोतड्या सडवा किंमत ५६,००० रूपये, ३) साबीर रहीम पठान २८ पोतड्या सडवा किंमत १,१२,००० रूपये, ४) चंद्रशिला श्रावण कनोजे २० पोतड्या सडवा किंमत ८०,००० रूपये, ५) सुखवंता बाबूराव बरियेकर ३६ पोतड्या सडवा किंमत १,४४,००० रुपये असा एकूण ४,८०,००० रुपयांचा माल नाश करण्यात आला. सदर कारवाई पो नि देवीदास कठाळे यांच्या मार्गदर्शनात त्यांचे उपस्थितित पो हवा नितेश बावणे, पो ना श्रीरामे, पो शि दमाहे, पो शि हिरापुरे, पो शि शेख यांनी केली.