स्थानीक गुन्हे पथकाची कामगिरी
गोंदिया : गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील मौजा बटाना येथील तक्रारदार श्री. नोहरलाल चुन्नीलाल रहांगडाले वय 64 वर्षे यांचे मालकीचा महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर क्र. MH- 35G- 4766 हा त्यांचे शेतातील शेडमध्ये ठेवलेला कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने फिर्यादी यांचे तक्रारीवरून पो. ठाणे गोंदिया ग्रामीण येथे अप. क्रं.257/2023 कलम 379 भादंवि अन्वये दाखल करण्यात आले होते.
पोलीस अधिक्षक, गोंदिया, मा. श्री निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, श्री. अशोक बनकर, यांचे चोरीच्या गुन्ह्यातील ट्रॅक्टर ट्रॉली व चोरट्यांचा शोध घेवून तत्काळ गुन्हा उघड करण्याचे प्राप्त निर्देशाप्रमाणे नमुद गुन्ह्यांचे तपासाच्या अनुषंगाने ठाणेदार गोंदिया ग्रामीण श्री. सचिन म्हेत्रे तसेच स्था.गु. शा. पो. नि. श्री. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात सदर गुन्ह्यात चोरीस गेलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली व अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यात येत होता.
त्या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे निर्देश सूचना प्रमाणे स्थानीक गुन्हे शाखेतील पोलीस पथक घटनास्थळाची पाहणी करून परिसरात ट्रॅक्टर व गुन्हेगारांचा शोध करीत असताना गुप्त बातमीदारकडून माहिती मिळाली की, ईसंम नामे- रजत ऊर्फ राजा बडगे राहणार- दतोरा याने त्याचे मित्र- आदेश भालाधरे व ईतर दोघे असे चौघांनी मिळून बटाना ते असोली रोड लगत असलेल्या विटा तयार करण्याच्या कारखान्यां मधून रात्र दरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करून विक्री करीता कोहमारा मार्गे नागपूरकडे घेवून गेल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली. अश्या प्राप्त गोपनीय माहिती प्रमाणे पथक आरोपी व ट्रॅक्टर चे शोधकामी रवाना होवून गुन्ह्यातील चोरीच्या ट्रॅक्टर क्र. MH- 35G- 4766 चा व आरोपी यांचा शोध करीत जात असताना गोंदिया – नागपूर नॅशनल हायवे 6 वरील साकोली च्या पुढे के. के. ढाबा जवळ गुन्ह्यातील ट्रॅक्टर दिसून आल्याने चालकास थांबण्याचा इशारा केला चालकाने ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असताना पो. स्टाफ ने पाठलाग करत आरोपी रजत ऊर्फ राजा वल्द दादुराम बडगे वय 32 वर्षे राहणार दतोरा ता. जि. गोंदिया यास ताब्यांत घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेला ईसंम नामे रजत ऊर्फ राजा वल्द दादुराम बडगे वय 32 वर्षे राहणार दतोरा यास विश्वासात घेऊन गुन्ह्यातील ट्रॅक्टर चोरी बाबत विचारपूस केली असता त्याने त्याचे ईतर 3 फरार साथीदार आदेश चरनदास भालाधरे वय 26 वर्ष, अनीस ओमेंद्र नागभीरे वय अं. 23 वर्ष, नितेश छविलाल कावळे वय अं 30 वर्ष रा. तिन्ही दतोरा सोबत मिळून ट्रॅक्टर ट्रॉली चोरी केल्याचे सांगीतले.
आरोपी रजत बडगे याचे ताब्यातून अप.क्र. 257/2023 मधील महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर क्र. MH- 35G- 4766 किंमती 4 लाख रुपये व लाल रंगाची ट्रॉली क्र. MH- 35 F- 3458 कि. 1 लाख रुपये असा एकूण किंमती 5 लाख रूपये चा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी रजत ऊर्फ राजा वल्द दादुराम बडगे वय 32 वर्षे राहणार दतोरा ता. जि. गोंदिया यांस पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे. सदर गुन्हयाचा तपास पो. ठाणे गोंदिया ग्रामीण पोलीस करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखा गोंदिया, पो.उप.नि महेश विघ्ने, स फौ. अर्जुन कावळे, पो. हवा. राजेन्द्र मिश्रा, महेश मेहर, भुवन लाल देशमुख, इंद्रजित बिसेन, संतोष केदार, अजय रहांगडाले,चा.पो. हवा. लक्ष्मण बंजार यांनी केलेली आहे.
ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या गुन्हेगारास ट्रॅक्टर-ट्रॉली सह अटक
RELATED ARTICLES