Friday, June 6, 2025
Google search engine
HomeUncategorized56 मोबाईल महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुळ मालकांना केले परत

56 मोबाईल महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुळ मालकांना केले परत

गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण (D.B.) पथकाची प्रशंसनीय कामगीरी
गोंदिया : गोंदिया शहर पोलीस ठाणे हद्दीतुन मागील 3 महिन्यात वेगवेगळया ठिकाणाहुन वेगवेगळे कंपनीचे अॅन्ड्राईड मोबाईल हँडसेट हरविल्याच्या तक्रारी गोंदिया शहर पोलीस ठाणेस प्राप्त झालेल्या होत्या. सदर तक्रारीचे गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील ठाणेदार श्री. किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक यांनी गंभीर दखल घेवून त्यांच्या अधिनस्त गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांना मार्गदर्शन करुन हरविलेल्या मोबाईलचे शास्त्रोक्त पध्दतीने शोध घेण्याबाबत आदेशीत केले. त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार पोशि- अशोक रहांगडाले यांनी हरविलेल्या मोबाईलचे केंद्र शासनाच्या सेंट्रल इक्विपमेंट आइडेंटिटी रजिस्टर (CEIR) या अप्लीकेशनवर हरविलेले मोबाईल चे अर्ज अपलोड करुन गोंदिया शहर डी.बी. पथकाने पोलीस ठाणे हद्दीतुन हरविलेले किंमती 5,15,200/- रु. चे एकुण 56 मोबाईल बुध्दीकौशल्याचा वापर करुन अती परिश्रमाने शोधुन काढले. सदरचे मोबाईल 01 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज दि. 03/05/2025 रोजी श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया व गोंदिया शहर पोलीस ठाणे येथील श्री. किशोर पर्वते, पोलीस निरीक्षक, सपोनि/गेडाम, पोउपनि/डोंगरवार, पोउपनि/चन्नावार, श्रेपोउपनि/थेर व मपोउपनि/बिजली मॅडम यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आले.
मोबाईल मालकांना त्यांचे हरविलेले मोबाईल त्यांच्या हाती परत येताच त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व्दिगुणीत होवून समाधान दिसत होते. पोलीसांच्या या स्तुत्य कामगीरीचे सगळीकडेच कौतुक होत आहे. सदरची उल्लेखनीय कामगीरी मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्रीमती रोहीणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक श्री किशोर पर्वते, डी.बी. पथकातील अंमलदार पोहवा/कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, प्रमोद चव्हाण, पोशि/अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, सोनु नागपुरे, राकेश बंजारे, प्रमोद शेंडे तसेच सायबर सेल येथील प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात संजय मारवाडे, योगेश रहिले, रोशन येरणे यांनी कामगिरी बजावली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments