Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorized6.6 लाखांचा अवैध गौण खनिज जप्त

6.6 लाखांचा अवैध गौण खनिज जप्त

गंगाझरी पोलिसांची कारवाई

गोंदिया : पो.स्टे. गंगाझरी येथील पोलीस अंमलदार यांनी गुप्त बातमीदार मार्फत प्राप्त माहिती वरून दिनांक 12/04/2023 रोजी 6.40 वा. चे सुमारास फत्तेपुर ते मौजा ओझीटोलाकडे जाणाऱ्या रोडवरील नहराजवळ किन्ही घाटावरील वैनगंगा नदीपात्रातून अवैधरीत्या गौण खनिज रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या इसमास महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनासह पकडले.
या प्रकरणी पो. ठाणे गंगाझरी येथे ट्रॅक्टर चालक नामे राहुल देवेंद्र सरोदे, वय 23 वर्षे, रा. नवेगाव, धापेवाडा, ता. तिरोडा जि. गोंदिया व मालक नामे सोमा लक्ष्मण बरैया, वय 45 वर्ष, रा. नवेगाव, धापेवाडा, ता. व जि. गोंदिया यांचेविरुद्ध पो. ठाणे गंगाझरी येथे अपराध. क्र. 124/2023 कलम 379, 34 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला असून वरील नमूद आरोपी याचे ताब्यातून एक पांढऱ्या रंगा ची महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्र. MH 32 Q 2351 किंमत 06 लाख रु. व त्यामध्ये रेती 1 ब्रास रेती किंमत 06 हजार असा एकूण किंमत 6 लाख 6 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई मा. वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली पो. ठाणे गंगाझरीचे पो.नि. श्री. महेश बनसोडे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे गंगाझरी येथील स.पो.नि. पोपट टिळेकर, पोहवा मनोहर अंबुले, चापोहवा तुळशीदास पारधी, पोना महेंद्र कटरे, पोना हरीश कटरे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments