कुठलाही ताप कमी न समजता तात्काळ रक्त तपासणी करा
येता कणकण तापाची, करा तपासणी रक्ताची : डॉ.विनोद चव्हाण, जिल्हा हिवताप अधिकारी
गोंदिया : जिल्ह्याची सीमा ही मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्याला व गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे. दरवर्षी जिल्ह्यातील मजूर हे तेंदू पत्ता, पत्ता सीजन, बास कटाई, बांधकाम, रस्ता कामे व इतर विविध कामानिमित्त स्थलांतरित करीत असतात. परंतु तिथे गेल्याने आपल्या आरोग्याची काळजी न करता दिवस रात्री कामे करुन उघड्यावरती झोपत असतात. गोंदिया लागून असलेल्या सीमा भागात जंगलव्याप्त भाग असल्याने परतीच्या वेळी येताना आजारी किंवा हिवताप संसर्ग घेऊन येण्याची शक्यता असते.सद्यस्थितीत जिल्ह्यात सर्वत्र बाहेर कमावण्यासाठी गेलेले मजुर स्वगावी आपल्या जिल्ह्यात परताना दिसत आहे.जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या संकलीत माहितीनुसार जवळपास 9600 स्थलांतरीत मंजुर हे बाहेरगावी आपला जिल्हा सोडुन ईतरत्र ठिकाणी पत्ता सिजन किंवा विविध कामानिमित्त गेलेले आहेत.आरोग्य विभाग व हिवताप विभाग जिल्ह्यात स्थलांतरीत मजुरांपासुन हिवतापाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस रात्र झटत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 672 स्थलांतरीत मजुरांचे रक्त तपासणी करण्यात आली असुन त्यात 18 लोक हिवताप दुषित आढळले आहेत.
आरोग्य विभागामार्फत आशा सेविका,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका यांचे मार्फत स्थलांतरीत मंजुराचा शोध घेवुन गावात आल्याबरोबर त्यां लोकांची हिवताप चाचणी संबंधाने आर डी के.(जलद ताप सर्वेक्षण कीट) द्वारे रक्त तपासणी करीत आहे. आरोग्य कर्मचारी दिवस रात्र एक करुन गावोगावी गृहभेटीतुन स्थलांतरीत मजुरांचे रक्त तपासणी करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
तरी परतीच्या वेळी आल्यानंतर कुठलेही ताप सदृश्य किंवा इतर लक्षणे आढळून आल्यास शासकीय आरोग्य संस्थेमध्ये जावे तसेच गावपातळीवर आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका यांचे जवळ हिवताप चाचणी संबंधाने आर डी के.(जलद ताप सर्वेक्षण कीट) उपलब्ध आहे.तरी कुठलाही ताप कमी न समजता रक्ताची तपासणी करून घेण्याबाबतचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी केले आहे. स्थलांतरित मजूरांनो हिवताप सदृश्य कुठलीही लक्षणे जसे ताप,सर्दी,अंगदुखी, मळमळ,उलटी,जुलाब,ह्गवण व अतिसार इत्यादी लक्षणे दिसल्यास कुठल्याही भोंदुबाबा किंवा अप्रशिक्षित पदवी नसलेल्या डॉक्टरांना न दाखवता जवळच्या शासकीय दवाखान्यात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे यांनी केले आहे.
672 स्थलांतरीत मजुरांची रक्त तपासणी दरम्यान 18 लोक हिवताप दुषित
RELATED ARTICLES