प्रवासी निवारे अभावी प्रवाशांची तारांबळ
गोंदिया : आमगाव तालुक्यातील मुख्य शहरातच बसस्थानक निवारे अभावी प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.बस थांबेल तिथेच प्रवाश्यांना धावा धाव करून महामंडळाची एसटी बस पकडुन प्रवास करावा लागत आहे. आमगाव शहरातून अनेक गावांना प्रवाशांचे मार्गक्रमण करताना गोंदिया , देवरी , सालेकसा, तीगाव, कामठा कडे जाणारा मार्गावर प्रवाश्यांना एसटी बस पकडण्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा सोईस्कर ठरला आहे. या चौक परिसरातच जुने बसस्थानक खाजगी जागेवर भाड्याने अनेक वर्ष पर्यंत वास्तव्यास होते.यातच एसटी महामंडळाने निर्जन अश्या सालेकसा मार्गावर नवीन बसस्थानकाचे बांधकाम केले.यामुळे शहरातील एसटी बस थांब्यावर प्रवाश्यांना धावा बंद करण्यात आले होते.परंतु अनेक मागणी नंतर शहरात देवरी रोड, गोंदिया रोड व तिगाव मार्गावर एसटी बस थांबा देण्यात आले.
परंतु प्रवाशांच्या करिता लागणारे प्रवाशी निवारे देण्यात मात्र शासणाला व लोकप्रतिनिधींना विसर पडला आहे.प्रवाश्यांना अद्यापही या मार्गावर बस थांब्यावर निवारे नसल्याने प्रवाशी उनाचे चटके सहन करीत तर पावसाळ्यात ओलेचिंभ होत एस टी बस पकडून प्रवास करीत आहे. परंतु प्रवाशांच्या करिता लागणारे प्रवाशी निवारे देण्यात मात्र शासणाला व लोकप्रतिनिधींना विसर पडला आहे.प्रवाश्यांना अद्यापही या मार्गावर बस थांब्यावर निवारे नसल्याने प्रवाशी उन्हाचे चटके सहन करीत तर पावसाळ्यात ओलेचिंभ होत एसटी बस पकडून प्रवास करावा करायला विवश आहेत. शहरातून जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बसचे निर्धारित जागेवर थांबा नसल्याने मर्जीप्रमाणे वाट्टेल तिथे बस थांबा देतात तर दुसरीकडे विना थांबा देत सरळ निघून जातात त्यामुळे प्रवाशांची मात्र हयगय होत असताना दिसते, वाहक व चालकांच्या मर्जीप्रमाणे एसटी धावत व सुटत असल्याने यात मात्र प्रवाश्यांना धावा धाव करून बस पकडणे म्हणजे स्पर्धे प्रमाणे आहे. देवरी, गोंदिया रोड वरील प्रवासी निवारे नसल्याने वाट्टेल त्या ठिकाणी प्रवाशी आश्रय घेण्यास बाध्य ठरत आहे.
महिला प्रवाशांची तारांबळ
मुख्य शहरातच प्रवाशी निवारे तर नाहीच पण स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची यासाठी फार तारांबळ उडत आहे.नगर परिषद,स्थानिक लोकप्रतनिधींनी कधी दखल घेतली नाही.महिला प्रवाश्यांना तर प्रवास करिता या मार्गावर एसटी बसेस पकडण्यासाठी टपऱ्या वरील गुंड प्रवृत्तीच्या वेक्तीना सामोरे जाण्याची पाळी येते.याकडे प्रशासनाने कधी दखल घेतली नाही.या राज्यमार्ग वर सुविधायुक्त प्रवासी निवारे देण्यासाठी स्थानिक नगर परिषद प्रशासन व लोकप्रिनिधींनीही दखल घ्यावी अशी मागणी समाजसेवी मोहिनी निंबार्ते,ज्योती खोटेले,उमादेवी बसेन,सुनीता येरने, शिलाताई हजारे यांनी केले आहे.