प्रशासन निद्रावस्थेत, पुलावर मोठे खड्डे, पुलाला कंपन, पुलावरील सुरक्षा रॉड ही गायब
आमगाव : राष्ट्रीय राज्य महामार्ग ५४३ गोंदिया आमगाव देवरी या मार्गावरील कीडंगीपार पुल पुर्णतः जर्जर व खड्डयात रूपांतर झाले आहे.या मार्गावर पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे ठरले आहे .परंतु राज्य महामार्ग बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन निद्रावस्थेत आहे.या पुलावर धोक्याची वाट तर प्रशासन बघत तर नाही असा सवाल आता नागरिक करीत आहेत.
गोंदिया आमगाव देवरी राज्य महामार्ग क्रमांक ५४३ रस्ते महामार्ग जिल्ह्यातील वाहतुकीचे मोठे केंद्र आहे.या भागातून मध्यप्रदेश ,छत्तीसगड या राज्यांना जोडणारा हा मार्ग आहे.या मार्गावरून आंतरराज्यीय दळणवळण नियंत्रित करण्यात येते,परंतु महामार्ग बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासन या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी निकामी ठरली आहे.या मार्गावरील अनेक पुल पुर्णतः जर्जर झाले आहे तर कालबाह्य झाले आहे.या पुलांचे नवीन बांधकाम व्हावे यासाठी प्रशासन व लोक्रतिनिधींनीही कधी पुढाकार घेतला नाही.त्यामुळे महामार्गावरील रस्ते पुलांची गंभीर अवस्था पुढे आली आहे.अनेक पुलावरील दोन्ही बाजुवरील सुरक्षा लोखंडी कठडे तुटून पडली आहे .त्यामुळे पुलावरील वाहतूक धोक्याची ठरली आहे. पुलावरील रस्त्यात मोठे खड्डे पडल्याने पुल पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थिती पावसाचा जोर कायम असून नदी नाले भरून वाहत आहेत.त्यातच पुलावरील खड्डयात पाणी साचून भरले आहेत.यात वाहनांचे वाहतुकीचे अंदाज धोक्याचे ठरत आहे.पुल धोक्याचे असून सुद्धा जड वाहने सुसाट वेगाने धावत आहेत.परंतु प्रशासन या पुलावर धोक्याची वाट बघत आहे का असा सवाल नागरिक करीत आहेत.
जर्जर पुल तर त्यावरील खड्डे मात्र विभाग निद्रावस्थेत
आमगाव तालुक्यातील अनेक मोठ्या लाटेने वाहणारे नाले पुल जर्जर किंवा कालबाह्य झाले आहेत.तर त्याच पुलावर खड्डे पडले आहे याकडे मात्र राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्ग बांधकाम विभाग लक्ष घालत नाही. त्यामुळे या पुलांची गंभीर अवस्था पुढे आली आहे. पावसाळा सुरू असून अद्यापही याकडे संबंधित विभाग निद्रावस्थेत असल्याचे निदर्शनास येत आहे. हा विभाग या पुलावर अपघात होण्याची वाट तर बघत नाही ना! असा सवाल नागरिकांना पडला आहे. याबाबत लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी अशी मागणी रवी क्षीरसागर, प्रा .सुभास आकरे,हुकूम बोहरे, संभुद्याल अगरिका,काशिराम हुकरे,बालाराम व्यास, बाला ठाकूर,श्रीमती उमादेवी बिसेन, मोहिनी निंबार्ते,ज्योती खोटेले , शीलाताई हजारे यांनी केले आहे.