पाच वर्षांपासुन फरार आरोपीला रेल्वे पोलिस गोंदियाने पकडले

0
472

गोंदिया : रेल्वे पोलिस स्टेशन गोंदिया येथे दाखल गुन्हा रं न 232/2019 कलम 328,379 मांदवि मधील 5 वर्षांपासुन फरार असलेला आरोपी निजामुद्दीन शेख फरमुद्दिन शेख वय 50 वर्षे राह, शिवगंज बालुवडी पोस्ट खोदागंज थाणा बहादुरगंज जिला किशनगंज बिहार यास नेपालचा सीमेलगत असलेल्या अत्यंत दुर्गम भागातून बिहार पोलिस याच्या मदतीने शोध घेवुन पकडुन योग्य कार्यवाही करण्यात आली.

सदरची कारवाही पोलीस अधिक्षक प्रियंका नारनवरे लोहमार्ग नागपुर, पोलीस उपअधिक्षक दत्ताराम राठौर, उपविभागिय अधिकारी पाडुरंग सोनवणे याचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी रेल्वे पोलीस ठाणे सपोनि (API) प्रतिभा राउत, पोना, विनोद खोब्रागडे, पोलीस अंमलदार धिरेद्र कटुके यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here