Tuesday, April 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवाटोला गावाजवळ ट्रक जळून खाक, 28 लाखांचा नुकसान

नवाटोला गावाजवळ ट्रक जळून खाक, 28 लाखांचा नुकसान

गोंदिया : रायपूर ते गोंदियाकडे ट्रक क्रमांक MH 40 – BL8001 टाटा कंपनीचा ट्रक स्वतः चालक आणि मालक मिथुन शामकुवर नागपुरे हे चालवत होते. अचानक सालेकसा पासून नऊ किलोमीटर अंतरावर नवाटोला या गावाजवळ अचानक ब्रेक लायनर मध्ये जाम झाल्यामुळे समस्या निर्माण होऊन चाक गरम झाले आणि टायरने आग पकडली. त्या ट्रकमध्ये पशु आहार वाहून नेल्या जात होता. ही दुर्घटना 28 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून ३० मिनिटांनी घडली. जवळपास साडेआठ लाख रुपयाच्या मालाचे नुकसान झाले. तसेच ट्रकची किंमत जवळपास 20 लाख असल्याचे मालकाने सांगितले. चालक आणि मालक हा राहणार सावरी तालुका गोंदिया येथील रहिवासी असून, तशी तक्रार पोलीस स्टेशन सालेकसा येथे नोंदविण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments