गोंदिया : ५ जून २०२५ रोजी झालेल्या हृदयद्रावक घटनेत नागपूर- रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील देवरी तालुक्यातील भरैगांव फाटा परिसरात एका भरधाव कारने ४१ वर्षीय युवकांचा अपघात केल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. यात मृतक नामे, कैलास मेश्राम वय- ४१ वर्ष रा. शिरपूर/बांध यांचा अपघाती मृत्यू झाला. यामुळे गावात शोककळा पसरलेली आहे.
माहितीनुसार, मृतक शिरपूर गावावरून नैनपुर/भर्रेगाव येथे काही कामानिमित्त आला होता. काम आटपून गावाकडे निघण्यासाठी पायी राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना, देवरीकडून शिरपूरच्या दिशेने जाणारी चारचाकी वाहन क्र. एम.एच. ३५ ए.आर. ७१७१ कारचा वेग प्रचंड होता. त्यातच वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट मृतक नामे, कैलास मेश्राम यांना धडक दिली. यात मृतक गंभीर जखमी झाल्याने, आजुबाजुच्या लोकांनी एकच आरडाओरडा करत बचाव कार्यासाठी धावून आले असता अपघातातीलच वाहनचालकाने मृतक नामे कैलास याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय देवरी येथे दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतक कैलास मेश्राम आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता आरटीओ चेक पोस्ट शिरपूर बांध येथे मोल मजुरीचे कामे करीत होता. मृतकाला दहा वर्ष तसेच आठ महिने वयाची दोन मुली आहेत. पित्याच्या अचानक अपघाती निधनामुळे चिमुकल्यांच्या डोक्यावरील छत्र हरवून गेले. मृतकाला पत्नी, दोन मुली तसेच बराच मोठा आप्त परिवार असून, मृतकाच्या शवविच्छेदनानंतर आज शिरपूर येथील मोक्षधामावर अंतिम संस्कार होणार आहे. सदर कार चालकांवर देवरी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून, पोलिस प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे.