आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते १ कोटी ६० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

0
227

गोंदिया : लेखा शिर्षक 50-54 अंतर्गत मार्तंड नगर गाव चुलोद ते गोंदिया असा एकूण 3.00 किमी मार्ग, मंजूर रक्कम 1 कोटी रुपये व ग्रामपंचायत इमारत फुलचूरटोला ते सेल्स टॅक्स कॉलनी पर्यंत सिमेंट रस्त्याचे बांधकाम, मंजूर रक्कम 60 लाख रु. अशा एकूण 1 कोटी 60 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते परिसरातील गणमान्य नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. रस्ता तयार झाल्यानंतर याचा लाभ परिसरातील शेतकरी, व्यापारी व विद्यार्थ्यांना होईल असा विश्वास आमदार विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला.

दरम्यान फुलचुर कार्यक्रमात सरपंच उषाताई ब्राह्मणकर, मुनेशजी रहांगडाले, अशोकजी इटनकर, पप्पूजी खंडेलवाल, जीवनजी बनसोड, कलामताई, कोमलताई धोटे, कटरेताई, भांडारकर जी, रहांगडाले जी, सव्वालाखे जी, प्रकाश घडोलेजी, दिनेशजी तिडके तसेच परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here