कालीमाटी येथील प्रकरण
गोंदिया : गोरेगाव तालुक्यातील कालीमाटीr येथील एका गतिमंद मनोरूग्ण युवतीवर दोन नराधमांनी अत्याचार केले. या संदर्भात गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून अशा नराधम आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुशिल राऊत यांनी केली आहे. यासंदर्भात गोरेगावचे ठाणेदार भुसारी यांची भेट घेवून या विषयावर चर्चा केली. दरम्यान पिडीत व तिच्या कुटूंबाला न्याय देण्यात यावा, अशीही विनंती केली.
गोरेगाव पोलिस ठाण्यातंर्गत येत असलेल्या कालीमाटी येथे एका गतिमंद व मनोरूग्ण युवतीवर दोन नराधमानी अत्याचार केला. सदर युवती ही गतिमंद असून मनोरूग्ण आहे. ती कालीमाटी येथे आपल्या बहिणीकडे वास्तव्यास होती. तिची बहिणी व घरातील इतर लोक विट भट्ट्यावर कामाला गेले होते. अशात पिडीत युवती ही घरी एकटीच राहत असे. नराधमांनी याच संधीचा लाभ घेत पिडीत युवतीवर अत्याचार केला. ही बाब शेजारच्या लक्षात येताच घटना उजेडात आली. पिडीतेच्या बहिणीच्या तक्रारीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ दखल घेत या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली. या संदर्भात आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष सुशिल राऊत यांनी समाजबाधवांसह पिडीत कुटूंबाची भेट घेवून सात्वंन केले. तसेच गोरेगाव पोलिस ठाण्यात जावून पो.नि.भुसारी यांची भेट घेतली. या घटनेने महिलांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अशा आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, पिडीत युवतीला शासनाने ५ लाख रूपये मदत करावी, अशी मागणी आदिवासी गोवारी समाज संघटनेचे अध्यक्ष सुशिल राऊत, गोरेगाव तालुकाध्यक्ष विजय नेवारे, रिपाई (आठवले) पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाऊ गजभिये, वैâलाश राऊत, सुखराम कवरे, खेमराज साखरे, नंदलाल सोनवाने, रवि राऊत, वामन वाघाडे यांच्या समाजबांधव उपस्थित होते.
अत्याचार प्रकरणातील त्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या
RELATED ARTICLES