गोंदिया : पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गोंदिया जिल्हयातील वाढते गुन्हेगारी चे प्रमाण लक्षात घेवून अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन व आळा घालणे करीता सर्व पोलीस स्टेशन चे हद्दीत चालणारे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी, यासारखे व ईतर अवैध धंदे, यांचेवर धाडी घालून कारवाई करण्या बाबत स्थानिक गुन्हे शाखेस निर्देशित करून जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर छापे टाकून समुळ नष्ट करण्याबाबत तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
या अनुषंगाने जिल्ह्या तील अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगार प्रवूत्तीच्या इसमांविरुद्ध कारवाई करण्या करीता स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्री. दिनेश लबडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व पो. अंमलदार यांना याबाबत सूचना केल्या होत्या. त्या नुसार स्थागुशा पथकाची अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमा विरूद्ध जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत असून धडक कारवाई करण्यात येत आहे. मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री.निखिल पिंगळे अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर, यांचे आदेश व निर्देशा प्रमाणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम छेडून 25/03/2023 रोजी रात्री 01.35 वाजता दरम्यान किन्ही घाट येथील वैनगंगा नदी पात्रातुन किन्ही गावाकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचून छापा कारवाई केली असता अवैधरित्या गौण खनिज रेतीची चोरी करणाऱ्या दोघांना ट्रॅक्टरसह पकडण्यात आले.
सदर प्रकरणी ट्रॅक्टर चालक – मालक अमितसिंग नरेश सिंग जतपेले वय 27 वर्षे रा. किन्ही , तालुका जिल्हा- गोंदिया ट्रॅक्टर क्र. MH- 35 AR – 1545 चा (चालक – मालक,), संजय परदेशी कहानवत वय 37 रा. किन्ही तालुका जिल्हा- गोंदिया ट्रॅक्टर क्र. MH- 35 AR- 3089 चा (चालक – मालक,) याचेविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 379, अन्वये गुन्हा नोंदविण्या त आलेला असुन त्यांचे ताब्यातून एक निळ्या रंगाचे स्वराज कंपनी चे ट्रॅक्टर क्र .MH 35 AR 1545 व 1/2 ब्रास रेती, एक निळ्या रंगाचे पॉवर ट्रॅक कंपनीचे ट्रॅक्टर क्र .MH 35 AR 3089 व 1/2 ब्रास रेती असा एकूण 12 लाख 3000 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील कारवाई रावणवाडी पोलीस करीत आहेत. सदरची कारवाई मा. वरिष्ठाचे मार्गदर्शना खाली स्था. गु. शा. चे पो. नि. श्री दिनेश लबडे यांचे मार्गदर्श नात स्था. गु. शा. येथील पथक मपोउपनि.वनिता सायकर,पोहवा.भुवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, रियाज शेख, पोशि संतोष केदार, मपोशि स्मिता तोंडरे, यांनी केलेली आहे.
अवैध गौण खनिज चोरी करणार्या दोघांना ट्रॅक्टरसह पकडले, 12 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
RELATED ARTICLES