Tuesday, October 15, 2024
Google search engine
HomeUncategorizedआपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची क्षमता बांधणी महत्त्वाची- प्रधान सचिव गुप्ता

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची क्षमता बांधणी महत्त्वाची- प्रधान सचिव गुप्ता

जीवित व वित्तीय हानी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, प्रधान सचिव गुप्ता यांनी केली जिल्हा नियंत्रण कक्षाची पाहणी..

गोंदिया,दि.10: राज्यात यावर्षी 2022 मध्ये मानसून कालावधी दरम्यान पूर परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या योग्य समन्वयाने पूर परिस्थिती हाताळण्यास यश आले. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची भूमिका महत्त्वाची असून सदर यंत्रणेची क्षमता बांधणी महत्वाची असल्याचे प्रतिपादन राज्याचे प्रधान सचिव (आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन) असीम गुप्ता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाची पाहणी दरम्यान केले.

यावेळी जिल्हाधिकारी नायना गुंडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, अधीक्षक संजय धार्मिक, दीपक परिहार व शोध बचाव दलाचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे दि.08 डिसेंबर 2022 रोजी प्रधान सचिव गुप्ता यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गोंदियाची विविध आपत्तीसाठी व आपत्ती दरम्यान करण्यात आलेली तयारीचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाला भेट दिली.

यावेळेस त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात भेट देऊन पूर परिस्थितीमध्ये सुरक्षा व बचाव करण्यासाठी उपयोगी साहित्यांची पाहणी करून सखोल माहिती घेतली. तसेच नियंत्रण कक्ष 24 x 7 कार्यरत ठेवून शोध व बचाव पथकामार्फत आपत्ती प्रसंगी गरजूंना तात्काळ मदत कशी दिली जाते? हे जाणून घेतले.

पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी पूर परिस्थितीबाबत माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील 96 गावांना पुराचा संभाव्य धोका आहे. वैनगंगा व बाघ नदीच्या काठावर असलेले गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील गावांमध्ये संभाव्य पुराचा धोका असतो. मध्य प्रदेश राज्यातील जिला शिवनी येथील संजय सरोवर जलाशय मधून सोडण्यात येणाऱ्या पाणीमुळे मान्सून कालावधीत पुराचा संभाव्य धोका असतो .

जिल्ह्यात येणाऱ्या विविध आपत्तीमध्ये आपत्तीची तीव्रता कमी करून जीवित व वित्तीय हानीचे प्रभाव कमी करण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृतीकार्यक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, रंगीत तालीमेद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. असे त्यांनी सांगितले.

प्रधान सचिव गुप्ता यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाद्वारे पूर परिस्थिती दरम्यान करण्यात येणारी कामे, नागरिकांना सुरक्षित हलविण्याकरिता करण्यात येणारी उपाय योजना व पूरपरिस्थिती दरम्यान शोध व बचाव कामात उपयोगी बोट, लाइफ जॉकेट, लाइफ बॉय, इमरजेंसी लाईट, OBM मशीन, मेगाफोन, सॅटॅलाइट फोन व घरघुती साहित्यापासून तयार करण्यात आलेले फ्लोटिंग डिवाइस इत्यादी साहित्यांची माहिती घेऊन जिल्हा प्रशासनाचे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे कौतुक केले.

येणाऱ्या काळात थंडीचे प्रमाण वाढल्यास शीतलहर तसेच उन्हाळ्यात उष्णलहर यामुळे उद्भवणाऱ्या आपत्तीच्या प्रसंगी जिल्हा प्रशासनाने पूर्वनियोजन करून मानक कार्यपद्धती (SOP) चे पालन करून आराखडा तयार करावे व नागरिकांमध्ये योग्य प्रमाणात जनजागृती करावी. तसेच इन्सिडेंट रीस्पोंस सिस्टीम (IRS) या नवीन प्रणालीचे वापर करून विविध विभागांची माहिती (डेटाबेस) तसेच विविध आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीची माहिती अद्यावत ठेवावी, अशी सूचना प्रधान सचिव गुप्ता यांनी यावेळेस दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments