Thursday, October 10, 2024
Google search engine
HomeUncategorizedआमगांव नगर परिषदवर महिलांची धडक

आमगांव नगर परिषदवर महिलांची धडक

पाणी पुरवठा अनियमित जनता त्रस्त
वर्षातुन सहा महिने मिळतो पाणी बिल मात्र पूर्ण वर्षाचा
गोंदिया : मागील पाच वर्षा पासून नगरात नळ द्वारे होत असलेला पाणी पुरवठा अनियमित होत असल्यामुळे महिला त्रस्त झालेले आहेत. एक दिवसा आड नळ शुरू करतात त्यातही अर्धा तास पेक्षा जास्त वेळ देत नाही त्यामुळे पुरेसा पाणी मिळत नाही. नळ शुरू करण्याची निश्चित वेळ नाही. अशी तक्रार करण्या करिता रण चौक वार्ड नं 3 ची महिला मंडळने दि.२२ फेब्रूवारी २०२४ रोजी नगर परिषद वर धडक दिली. परंतु त्या ठिकाणी जवाबदार अधिकारी नदारद होते.
नगर परिषदचे प्रशासन,कामकाज प्रशासक द्वारे होत असल्या कारणाने जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष होत आहे. कोणीही अधिकारी,कर्मचारी जनतेची कोणतिच समस्या,तक्रार ऐकून घेण्याच्या मूड मध्ये दिसत नाही. त्यामुळे जनतेने कुणाकडे जावे हेच समजत नाही. ही लोकशाही आहे की ठोकशाही आहे.
आमगांव नगरात आधी दररोज नळ येत असे परंतु मागील जवळपास पाच वर्षा पासून एक दिवसा आड किंवा कधी कधी दोन-दोन दिवस नळ येत नाही.यामुळे सगळी जनता व महिला त्रस्त झाले आहेत.वर्षातुन सहा महिन्या पेक्षा कमी दिवस नळा द्वारे पाणी पुरवठा होतो मात्र बिल पूर्ण वर्षभराचा वसुल केला जातो.
नगर परिषदचे मुख्य अधिकारी करिश्मा वैद्य महिन्यातुन फक्त चार-दिवसच कार्यालयात उपस्थित असतात.त्यामुळे नागरिकांचे काम वेळेवर होत नाही.फोन केला तर फोन रिसीव करीत नाही.आमगांव नगर परिषद लावारिस झाली की काय अशी आम जनतेत चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments