Saturday, July 27, 2024
Google search engine
Homeपॉलिटिक्सइतरांच्या कामांचे आपल्या नावे श्रेय लाटण्याकरीता भूमिपूजनदासांकडून परत भूमिपूजनाचा सपाटा

इतरांच्या कामांचे आपल्या नावे श्रेय लाटण्याकरीता भूमिपूजनदासांकडून परत भूमिपूजनाचा सपाटा

पत्रपरिषदेत शिवसेना जिल्हा प्रमुख पंकज यादव याचा आरोप

गोंदिया,दि.25ः- शहरात सध्या विकासकामांचा धडाका सुरु असून ज्या कामांचे भूमिपूजन आमदार महोदय गाजावाजा करुन करीत आहेत,तो निधी आमदार स्थानिक विकास निधीचा नव्हे तर महाविकास आघाडीच्या काळात माजी नगरसेवकांनी मंजूर करवून घेतलेल्या कामांचा असल्याचा उल्लेख शिवसेनेचे(ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांनी केला आहे.यादव यांनी आज गोंदियाच्या आमदाराकंडून २५ फेब्रुवारीला दिवसभर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला.पण या विकास कामाकरिता शहराला मिळालेला निधी हा वैशिष्टपूर्ण निधीतील आहे.त्यातच फेबुवारी 2022मध्ये कार्यकाळ संपण्याच्या एक आठवड्यापुर्वीच तत्कालीन नगराध्यक्षांनी स्थानिक सर्व नगरसेवकांच्या साक्षीने या कामांचे भूमिपूजन करवून घेतल्याची माहिती पत्रपरिषदेत दिली.

त्या विकास कामांचा निधी आता आलेला असतांना व स्थानिक आमदारांचा त्या निधीशी कुठलाही संबध नसतांना सुध्दा स्थानिक प्रभागातील माजी नगरसेवकांना डावलून आपल्या संघटनेच्या पदाधिका-यांच्ये नाव फलकावर घालून हे भूमिपूजन केले जात आहे. ज्यांचे नाव दिले जात आहे,त्यांचा मात्र या कामांशी काडीचाही संबंध नसतांना आपल्या नावाने श्रेय लाटण्याकरिता गोंदियातील नव्या भूमिपूजनदासांकडून परत भूमिपूजनाचा सपाटा लावल्याचा आरोप शिवसेना उद्भव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी आज २५ फेब्रुवारी शनिवारला शिवसेना कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेतून लावला आहे. पत्रपरिषदेला माजी नगरसेवक लोकेश यादव,जिल्हा उपप्रमुख तेजराम मोरघडे आदि उपस्थित होते. पुढे  यादव म्हणाले की आज करण्यात आलेल्या कामाचा निधी हा विद्यमान सरकारने तर आपल्या ६ महिन्याच्या कारभारातून दिला नसेल तर ही निधी महाविकास आघाडीची सत्ता असतांना मंजूरी मिळालेली आहे. आणि त्यात ही नगरपालिकेच्या शेवटच्या सत्रात तत्कालिन नगरसेवकांनी आपआपल्या वॉर्डातील राहून गेलेल्या महत्वाच्या कामांची विशेष बाब म्हणून मंजूरी करवून घेतली होती.त्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन नगराध्यक्षांनी आपल्या कार्यकाळात नगरसेवकांच्या साक्षीने करवून घेतल्यानंतर परत त्या एकाच कामाचे भूमिपूजन या भूमिपूजनदासांकडून आज करण्यात आले आहे. आणि त्यात ही सर्वसामान्य वॉर्डाचे प्रतिष्ठित नागरिक,माजी नगरसेवकांना डावलून आपल्या संघटनेच्या लोकांची नावे पुढे करून केले जात आहे. हे अत्यंत दुर्देवी असून गेल्या एक वर्षापूर्वी मंजूर कामांचा भुमिपूजन करून जनतेला भ्रमित केल्या जात असल्याचा ही आरोप पंकज यादव यांनी लावला आहे. वर्तमान आमदारांना शहराकरिता काही करायचेच असेल तर त्यांनी भूमिगट गटार योजनेच्या पार्ट २ करिता निधी नाही तर शहरातील रस्त्यांचे विद्रुपीकरणः करून जनतेला त्रास देण्याचे काम केले जात आहे. मोक्षधाम परिसरातील केरकचराची विल्हेवाट लावण्याकरिता निधी आणावे,पालिकेतील कर्मचा-यांची पगाराकरिता निधी आणावे,शहरातील कचरा उचलणारा ट्रॅक्टरकरिता निधी आणावे, कचरा गाडी स्वच्छता कर्मचा-यांची संख्या वाढविण्याकरिता प्रयत्न करावे,पालिकेतील मुख्याधिका-यांची जप्ती केलेली खुर्ची सोडवून आणावे.घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मागील २ वर्षा पासून ५ व्या टप्यातील अनुदान मिळालेले नाही,ते आणावे, नगरपरिषद शाळाकरिता निधी आणावे, शासकिय रुग्णालयात डॉक्टर नाहीत, रूग्णांना खाटा व औषध उपलब्ध नाही त्याकरिता निधी आणावे आदी कामे करुन आपले नाव करणे सोडून आमदार दुस-यांच्या प्रयत्नांने आणलेल्या निधीवर आपल्या संघटनेचे घालून जनतेची फसवणूकच नव्हे तर जनतेसोबत छळ करीत असल्याचा आरोप ही शिवसेना जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी यावेळी केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments