Friday, July 19, 2024
Google search engine
HomeUncategorizedखवल्या मांजराचे मटन कापताना वन विभागाने 3 आरोपींना पकडले

खवल्या मांजराचे मटन कापताना वन विभागाने 3 आरोपींना पकडले

गोंदिया : नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या तिरोडा तालुक्याच्या भजेपार (गोंडीटोला) येथे खवल्या मांजराचे मटन कापत असल्याची मिळालेल्या माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत तिघांना वनविभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.वनपरिक्षेत्र अधिकारी कौशिक यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्प लगत असलेल्या भजेपार/ गोंडीटोला शेती परिसरात खवले मांजर ची शिकार करून गोंडीटोला येथील आरोपी शिवकुमार बारकु कोडवते वय -33 , मनोहर शामराव मसराम वय -30 व राकेश टिकाराम कोडवते वय-२२ हे आपल्या राहत्या घरात खवले मांजराचे मटण कापत असताना वन विभागाने पकडले. त्यावेळी खवले मांजरचा 75% पेक्षा जास्त भाग कापलेला होता.
कापलेला मटण तसेच खवले मांजर कापण्यासाठी वापरण्यात आलेले अवजारे कुऱ्हाड , पावशी ( वीळा) खवले मांजराचे कापलेले मास , खवले , काळीज , आतडी जप्त केले . ही कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक शिवराज पिसाळ , धनंजय कोकाटे , स्वप्नील पायघान , सुनील भालेराव , सागर भेलावे , प्रणय वालदे, महेश रहांगडाले यांनी करून पुढील कार्यवाही साठी वनपरिक्षेत्र तिरोडा (प्रा.) यांचे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर प्रसुरी क्र. 03/104107/2023 अन्वये गुन्हा नोंद करण्यात येऊन पुढील कार्यवाही वनपरिक्षेत्र अधिकारी योगेंद्र सिंह IFS (परिविक्षाधीन) , वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक व कर्मचारी करीत आहेत. याकामी पर्यावरण संरक्षण बहुउद्देशीय संस्था भंडारा यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments