Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedखैर जातीचे लाकूड तस्करी करणाऱ्यास वाहनासह अटक

खैर जातीचे लाकूड तस्करी करणाऱ्यास वाहनासह अटक

अंदाजे 5 लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
गोंदिया : पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हददीत चालणारे सर्व प्रकारचे अवैध धंदयावर, अवैध धंदे करणाऱ्यावर प्रभावी धाडी टाकून अवैध धंदे समुळ नष्ठ करून अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करण्याबाबत निर्देशित करून सुचना केल्या होत्या.
या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक गोदिया श्री निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक बनकर, यांचे आदेशा नुसार पो.नि.श्री दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि.२७+२८ /०२/२०२३ रोजी पोलीस ठाणे दवनिवाडा, तिरोडा परीसरात रात्र दरम्यान अवैध धंदे रेड गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असतांना पथकास गुप्त बातमी दाराकडून माहीती मिळाली की, खैरलांजी म.प्र. कडुन तिरोडा मार्गे नागपुर कडे एक पिकअप वाहनात खैर जातीचे लाकुड तस्करी करून विक्री करीता जात आहे. अशा माहीती वरून पथकाने मौजा परसवाडा येथे दि.२८/०२/२०२३ चे रात्री अंदा. ०२.३० वाजता चे दरम्यान सापळा रचून नाकाबंदी केली असता एक पांढऱ्या रंगाचे टाटा कंपनीचे पिकअप वाहन क. एमएच. ३०. एल ४८८५ वाहन मिळुन आले. वाहनाची तपासणी केली असता वाहनाचे मागील डाल्यात खैर जातीचे लाकूड अंदाजे ३ ते ४ फुट लांबीचे ५० ते ६० सें.मी. व्यास असलेले अंदाजे १५० नग दिसून आले. सदर लाकुड, लाकडाचे मालकी हक्क बाबत व परवाना बाबत गाडीचे चालक विधीसंघर्ष बालक व सोबत असलेला रतनलाल सुरजलाल पटले यांना विचारपुस केली असता कोणतेही कागदपत्र नसल्याने व सदरचे लाकुड हे अवैधरिल्या विक्री करीता सिहोरा येथे नेत असल्याचे सांगीतलयाने जप्त करण्यात येवुन वनपरीक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक कार्यालय, वनविभाग तिरोडा यांना पुढील कार्यवाही करीता व भारतिय वन अधिनियमना अन्वये कारवाई होण्याबाबत पत्र देण्यात आले असुन ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही ईसमांना पुढील कायदेशिर कार्यवाही करीता प्रादेशिक कार्यालय, वनविभाग तिरोडा यांना स्वाधीन करण्यात आले आहे. सदर कारवाई वरीष्ठाचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री. दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि विघ्ने, पो.अंमलदार पो. हवा. ठाकरे, तुरकर, पटले यांनी केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments