Saturday, July 13, 2024
Google search engine
HomeUncategorizedखोडकिडीने रब्बीचे धान पीक होतंय उद्ध्वस्त!

खोडकिडीने रब्बीचे धान पीक होतंय उद्ध्वस्त!

नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्या; भजेपार ग्राम पंचायतीची मागणी
सालेकसा : सततचे ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस यामुळे रब्बीच्या धान पिकांवर खोडकिडिसह ईतर रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव वाढल्याने अल्पावधीतच अवघे शेत उद्ध्वस्त होत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महसूल आणि कृषी विभागाने तत्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचून पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भजेपार ग्राम पंचायतीने सालेकसाचे तहसिलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
बाघ प्रकल्पातील सिंचन आणि खासगी जलस्त्रोत यांच्या माध्यमातून भजेपारसह सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रब्बीच्या धान पिकाची लागवड केली. पिके जोमाने वाढत असतानाच आता मागील काही दिवसांपासून होत असलेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे किडींचा प्रचंड प्रादुर्भाव वाढलेला आहे. भजेपार येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील धानाचे लोंब सुकून पांढरे पडले असून जवळपास 80 टक्क्यांवर अनेकांचे नुकसान झाले आहे. रोगाचा प्रादुर्भाव एवढा प्रचंड आहे की, एक दोन दिवसातच संपूर्ण शेत उद्ध्वस्त होत आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांनी महागडी औषधे फवारून धानाची जपणूक केली परंतु आता औषधाचा देखील किडींवर परिणाम होताना दिसत नाही. ऐन कापणीवर धान येण्याच्या आधीच हातचे उत्पादन गेल्याने तोंडचा घास गेल्याची प्रचिती आली आहे. पिकांची झालेली प्रचंड हानी आणि यातील गंभीरता प्रशासनाच्या लक्षात यावी म्हणून चक्क रोगाने प्रभावित धानाचे रोपटे तहसिलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देतेवेळी दाखवण्यात आले. दरम्यान निवेदनाची प्रतीलीपी क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांना पाठविण्यात आली असून या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेटी देऊन नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार, उपसरपंच कुंदा ब्राह्मणकर, ग्राम पंचायत सदस्य रविशंकर बहेकार, रेवतचंद बहेकार, राजेश बहेकार, मनीषा चुटे, सरस्वता भलावी, आशा शेंडे, ममता शिवणकर, आत्माराम मेंढे यांनी केली आहे. निवेदन देताना ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांसह शेतकरी ऋषी ब्राह्मणकर, निलेश चुटे, प्रकाश शेंडे सहित ईतर शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments