Friday, June 14, 2024
Google search engine
HomeUncategorizedगांजाची खेप घेवून येणाऱ्यास एकास रंगेहाथ अटक

गांजाची खेप घेवून येणाऱ्यास एकास रंगेहाथ अटक

स्थाननिय गुन्हे शाखेची दर्जेदार कारवाई

5 किलो 140 ग्रॅम गांजा किंमती 1 लाख 28 हजार 600/- रुपयाचा मुद्देमाल जप्त

गोंदिया :पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा यांनी महाशिवरात्री उत्सव तसेच आगामी दरम्यान काळात होणारी निवडणूकीच्या अनुषंगाने आणि गोंदिया जिल्ह्यात वाढते चोरी, घरफोडीचे प्रमाण, अवैध धंदे लक्षात घेऊन चोरी, घरफोडी करणारे, अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा याकरिता, गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यावर दर्जेदार धाडी टाकून गांजा बाळगणारे, विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विरूध्द एन.डी. पी. एस. कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते..

या अनुषंगाने मा. वरिष्ठांचे प्राप्त निर्देश व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे, पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेची विविध पथके तयार करण्यात आलेली होती… या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाद्वारें जिल्ह्यातील चोरी,घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा, तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्ती च्या इसमांचे माहितीची खातरजमा, संकलन आणि विश्लेषण करण्यात येत होते . या अनुषंगाने स्था. गु. शां. पथकास दिनांक- 09/03/2024 रोजी पो.हवा.राजेंद्र मिश्रा, यांना गोपनिय बातमीदार कडून खात्रीशिर माहिती मिळाली की, इसम नामे- रॉबिन पटलिया, रा.रायपुर नावाचा व्यक्ती रायपुर वरून गांजाची खेप घेवून रेल्वेने गोंदिया रामनगर परिसरात येणार आहे….. अशी खात्रीशीर माहिती प्राप्त होताच पो.नि. लबडे आणि मा. वरिष्ठांना कळविण्यात आले…. मा. वरिष्ठांचे प्राप्त आदेश, दिशा निर्देश व प्राप्त परवानगी वरून प्राप्त खात्रीलायक माहितीच्या आधारे पोलीस ठाणे रामनगर हद्दीतील रेलटोली मालधक्का, परिसरात कारवाईस लागणारे आवश्यक सर्व साहित्य, पंच, पो.स्टाफ, सोबत घेऊन 15.45 वा. रवाना होवून रेलटोली मालधक्का परिसरात सापळा रचून अवैधरित्या गांजाची खेप घेवून येणाऱ्यास सायंकाळी 18.00 वाजता दरम्यान रंगेहाथ पकडण्यात आले…..

*ईसम नामे-* *रॉबिन उर्फ दिपलाल चैनलाल पटलिया, वय 46 वर्षे, रा. हॉउस न. 20, हॉउसिंग बोर्ड कॉलोनी, वार्ड न. 51, सुरजनगर, लभादि, रायपुर (छ.ग.)** हा रंगेहाथ मिळून आलयाने त्यास ताब्यात घेण्यात आले…..त्यास पोलीसांची ओळख देवून त्यास ताब्यात घेण्याचे कायदेशीर कारण सांगून प्राप्त माहितीप्रमाणे त्याचे ताब्यातील मिळुन आलेल्या दोन्हीं बॅगची पंचासमक्ष पाहणी केली असता… त्याचे ताब्यातील जांभळ्या रंगाच्या बॅगमध्ये सेलोटेप ने गुडाळलेले 2 बंडल तसेच गुलाबी रंगाच्या बॅग मध्ये सुध्दा सेलोटेप ने गुंडाळलेले 3 बंडल मिळून आले.. असे एकूण 5 बंडल मिळुन आले..त्या पाचही बंडलची पंचासमक्ष खोलून पाहणी केली असता, त्यात हिरवा ओलसर पाने, फुले आणि बिया मिश्रीत गांजा, एकूण वजनी 5 किलो 140 ग्रॅम, उग्र वास येत असलेला गांजा *किंमती एकूण 1,28,600/- (एक लाख अठ्ठावीस हजार सहाशे रूपयाचा मुद्देमाल)* मिळून आल्याने जप्त करण्यात आलेला आहे….. वरिष्ठांचे निर्देश सूचना मार्गदर्शनात सदर ची धाड कारवाईची सविस्तर जप्ती प्रक्रिया करण्यात आलेली आहे….

*अवैधरित्या गांजा विक्रीकरीता बाळगल्याप्रकरणी आरोपी ईसम नामे- रॉबिन उर्फ दिपलाल चैनलाल पटलिया, वय 46 वर्षे, रा. हॉउस न. 20, हॉउसिंग बोर्ड कॉलोनी, वार्ड न. 51, सुरजनगर, लभादि, रायपुर (छ.ग.)*

याचे विरूध्द पो. हवा. राजेंद्र मिश्रा, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया यांचे फिर्याद वरून पोलीस ठाणे रामनगर येथे *एन.डी.पी.एस.कायदा कलम 8 (क), 20, 29 अंन्वये* गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे…..आरोपीस जप्त मुद्देमालासह रामनगर पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे………….पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया…गुन्ह्यांचा तपास रामनगर पोलीस करीत आहेत…

सदरची दर्जेदार कामगिरी मा. वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे व मार्गदर्शनात lस्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. दिनेश लबडे, यांचे नेतृत्वात पोलिस अंमलदार सफौ.अर्जुन कावळे, पो.हवा. राजू मिश्रा, भूवनलाल देशमुख, चित्तरंजन कोडापे, महेश मेहर, प्रकाश गायधने, विठ्ठल ठाकरे, दुर्गेश तिवारी, मपोशि स्मिता तोंडरे यांनी बजावलेली आहे..

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments