Saturday, July 27, 2024
Google search engine
HomeUncategorizedगोरेगावात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

गोरेगावात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

खरेदी विक्रीच्या व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे आवाहन
गोंदिया : खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या स्थानिक विकास निधीतून गोरेगाव शहर येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. गोरेगाव शहरातील वॉर्ड क्र.३ मध्ये श्री नितेश येले यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकाम, वॉर्ड क्र.१ मध्ये श्री संजय येडे यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकाम व वॉर्ड क्र. ७ मध्ये श्री योगेश चौधरी यांच्या घरासमोर सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
गोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विशेष बैठक जनसंपर्क कार्यालय, गोरेगांव येथे माजी आमदार श्री राजेन्द्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर, श्री केवल बघेले, श्री विशाल शेंडे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकी संदर्भात योग्य नियोजन व निवडणूक पूर्व तयारी करण्याच्या सूचना प्रमूख मान्यवरांनी केल्यात. कृषी उत्पन्न बाजार समिती हि संस्था शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाच्या खरेदी विक्री करीता असून शेतकऱ्यांशी निगडित सर्व समस्या मार्गी लावण्यासाठी तालुका खरेदी विक्रीच्या व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी सर्वशक्ती निशी उमेदवार निवडून आणण्याकरिता कामाला लागावे अश्या सूचना माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी केली. यावेळी सर्वश्री राजेन्द्र जैन, गंगाधर परशुरामकर, केवल बघेले, विशाल शेंडे, कृष्णकुमार बिसेन, श्रीप्रकाश रहांगडाले, डॉ गणेश बघेले, रुस्तम येडे, सुरेंद्र रहांगडाले, सोमेश रहांगडाले, रामभाऊ हरिणखेडे, कमलेश बारेवार, परशुराम वंजारी, श्रद्धाताई रहांगडाले, उषाताई रामटेके, रामेश्वरी रहांगडाले, अर्चना चौधरी, सरिता येळणे, कुंदा रुकमोडे, दसरथ बिसेन, छगनलाल गौतम, लालचंद चव्हाण, टी. के. कटरे, रामभाऊ आगडे, अनुराज सरोजकर, प्रतीक पारधी, गेंदलाल गौतम, यु.जी.बिसेन सर, भोजराज चौहान, लिलेंद्र पटले, शोमेश्वर बघेले, नितेश येले, टेकेश रहांगडाले, अनुप पटले, किशोर कुंभरे, डेव्हिड राऊत, तांनूभाऊ हरिनखेडे, शिवाजी ठाकरे, महेंद्र कटरे, नरेन्द्र उके, कमलानंद तुरकर, धनेश्वर तिरेले, देवेंद्र ठाकरे, भोजराज चौहान सहित असंख्ये कार्यकर्ता उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments