ट्रॅक्टरच्या वादातून मुलाने केला बापाचा खून

0
230

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील बोदा येथे मुलाने ट्रॅक्टरचे वादातून जन्मदात्या बापाचा खून केल्याची घटना आज, 25 मार्च रोजी घडली. खून झाल्यानंतर मुलगा फरार झाला असून दवनीवाडा पोलीस त्याचा शोध घेत आहे.
तिरोडा तालुक्यातील बोधा येथील मृतक भैय्यालाल नागदेवी (55 वर्ष) याला दोन पत्नी असून तो आपले मोठ्या पत्नीसह गावातील बौद्ध विहारात राहत होता तर त्याचा लहान मुलगा दुसरी पत्नीसह गावात राहत होता. यांच्यात नेहमीच लहान मोठे वाद होत असून काल 24 रोजी लहान मुलगा लंकेश याने शेतीचे काम करता भैय्यालालचा ट्रॅक्टर आणला होता. आज, 25 रोजी भैय्यालाल ट्रॅक्टर परत नेण्यास गेला असता लंकेश व भैय्यालाल यांच्यात वाद झाल्यावर रागाचे भरात लंकेश भैय्यालाल नागदिवे यांनी काठीने वडिलांना मारहाण केली, यात भैय्यालालचा जागीच मृत्यू झाला तर मृतकाचे पत्नीस लोकेश याने जिवे मारण्याची धमकी देऊन घटना स्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती होताच दवनीवाडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश जाधव यांनी घटनास्थळ गाठून मृतकाचे शव उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठवून मृतकाचे पत्नीचे तक्रारीवरून दवनीवाडा पोलिसांनी आरोपी लंकेश भैय्यालाल नागदेवेचे विरोधात भादवी कलम 302 , 504 नुसार गुन्हा दाखल करून फरार आरोपीचा शोध दवणीवाडा पोलीस घेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here