गोंदिया : ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज संस्था ग्रामविकासाचे मंदिर आहे. नागरिकांच्या आशा, अपेक्षा करण्याचे प्रतिक आहे. त्यामुळे नागरिकांच्या आशा व अपेक्षांवर खरे उतरण्याची जबाबदारी ग्रापं पदाधिकारी म्हणून सरपंच, उपसरपंच व सदस्यांची आहे. गावातील प्रत्येक गरजुला घरकूल, शौचायल, पाणी आदी मुलभूत सोयीसुविधा देऊन आपले गाव आदर्श ग्राम घडवा, असे प्रतिपादन माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
ते भाजप कार्यकर्ता मेळावा भाजप समर्थित उपसरपंचाच्या सत्कार समारोहात बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष धनलाल ठाकरे, महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी हरिणखेडे, संजय टेंभरे, नेतराम कटरे, अशोक चौधरी, नंदू बिसेन, संजय कुळकर्णी, राजेश चतूर, सुनिल केलनका, प्रकाश रहमतकर, भावना कदम, विजय उके, रितेश मलघाम आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. अग्रवाल पुढे म्हणाले, उपसरपंचपद हे प्रशासकीयदृष्टया केवळ मानवाहक पद असले तरी या पदावर काम करणारा व्यक्त बसल्यास तो सरपंचाच्या खांद्याला खांदा लावून ग्रामविकासाला गती मिळवून देऊ शकतो. त्यामुळे उपसरपंचांनीही त्यादृष्टीने कार्य तत्पर असणे गरजेचे आहे. प्रास्ताविक धनलाल ठाकरे यांनी मांडले. प्रसंगी तालुक्यात भाजप समर्थित 20 उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला भाजप समर्थित सरपंच, सदस्य, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रवि ठकरानी ( प्रधान संपादक)
93593 28219