पदाधिकारी – कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न
गोंदिया. जिल्याच्या दौऱ्यावर असतांना आज एन एम डी महाविद्यालयाच्या सभागृह मध्ये पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक मा. श्री सुनिल तटकरे, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, मा. श्री धर्मरावबाबा आत्राम, पालकमंत्री, गोंदिया जिला, मा. श्री राजेन्द्र जैन, राष्ट्रीय सचिव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, मा. श्री मनोहर चंद्रीकापुरे, आमदार अर्जुनी मोरगांव विधानसभा, मा. श्री सुरज चव्हान, अध्यक्ष, प्रदेश युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, मा. श्री रुपाली चाकणकर, अध्यक्षा राज्य महिला आयोग व महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, मा. श्री प्रशांत कदम, अध्यक्ष प्रदेश विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, मा. श्री सुनिल मगरे, अध्यक्ष प्रदेश सामाजिक न्याय विभाग, मा. श्री कल्याण आखाडे, अध्यक्ष प्रदेश ओबीसी सेल, मा. श्री ईश्वर बाळबुध्दे, समन्वय, प्रदेश ओबीसी संगठना, मा. श्री गंगाधर परशुरामकर, अध्यक्ष, गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यांच्या उपस्थितीत पदाधिकारी – कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला.
याप्रसंगी बोलतांना खासदार तथा प्रदेशाध्यक्ष श्री सुनील तटकरे म्हणाले की, मा. श्री अजितदादा पवार व राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष मा. खा. श्री प्रफुल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एनडीएमध्ये सहभागी होयचा निर्णय घेतला पण महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा, धर्मनिरपेक्ष विचारांशी तडजोड केली नाही. सत्तेसाठी व केंद्रीय यंत्रणेच्या बचावासाठी सत्तेत सहभागी झाल्याचा आभास विरोधकांकडून निर्माण केला जातो. पण विकासासाठी व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत. ते पुढे म्हणाले भिन्न विचारसरणींचे पक्ष सरकार गठित करण्यासाठी एकत्रित येतात, 2019 मध्य शिवसेना भिन्न विचारधारा असून सोबत आले असे सांगत देशात विचारधारा वेगळी असून सरकार स्थापन झाले आहेत याचा सविस्तर आढावा प्रदेशाध्यक्षांनी उपस्थितां समोर मांडला. त्यामुळे आम्ही जी भूमिका घेतली ती काही वेगळी नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजितदादा पवार व खा श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली जो आपण निर्णय घेतला तो कोणत्याही यंत्रणेच्या भीतीपोटी घेतलेला नसून लोकशाहीच्या सिद्धांतावर विश्वास ठेवून तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी व राज्याच्या विकासासाठी हा निर्णय घेतलेला आहे ही भूमिका आपण जनसामान्यांपर्यंत पोहचवायला हवी असे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी केले.
या वेळी सर्वश्री सुनिल तटकरे, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, धर्मरावबाबा आत्राम, पालकमंत्री, गोंदिया जिला, राजेन्द्र जैन, राष्ट्रीय सचिव, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, मनोहर चंद्रीकापुरे, आमदार अर्जुनी मोरगांव विधानसभा, सुरज चव्हान, अध्यक्ष, प्रदेश युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, रुपाली चाकणकर, अध्यक्षा राज्य महिला आयोग व महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, प्रशांत कदम, अध्यक्ष प्रदेश विद्यार्थी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, सुनिल मगरे, अध्यक्ष प्रदेश सामाजिक न्याय विभाग, कल्याण आखाडे, अध्यक्ष प्रदेश ओबीसी सेल, ईश्वर बाळबुध्दे, समन्वय, प्रदेश ओबीसी संगठना, गंगाधर परशुरामकर, अध्यक्ष, गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, निखिल ठाकरे, नरेश माहेश्वरी, देवेन्द्रनाथ चौबे, केतन तुरकर, राजलक्ष्मी तुरकर, यशवंत गणवीर, पुजा अखिलेश सेठ, सुरेश हर्षे, निरज उपवशी, गणेश बरडे, प्रभाकर दोनोडे, रफीक खान, मोहन पटले, मनोज डोंगरे, रमेश ताराम, अजय गौर, योगेन्द्र भगत, डॉ. अविनाश जायस्वाल, माधुरी पालीवाल, लक्ष्मीताई सावरकर, विशाल शेंडे, प्रेम रहांगडाले, बालकृष्ण पटले, कुंदन कटारे, केवल बघेले, डॉ. अजय उमाटे, सुरेश हर्षे, सी के बिसेन, अशोक सहारे, कृष्णकुमार बिसेन, ममता बैस, जया धावडे, सतीश देशमुश, सुनिल भालेराव, विनीत सहारे, सचिन शेंडे, नानु मुदलीयर, राजेश भक्तवर्ती, कमलबापु बहेकार, माधुरी नासरे, प्रियाताई हरिणखेडे, दुर्गा तिराले, कुंदा दोनोडे, आशा पाटील, सुनील पटले, शैलेश वासनिक व शेकडोच्या संख्येने कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचा संचालन रवि मुंदडा व आभार कुंदन कटारे यांनी केले.