8 गुन्ह्यांची उकल : 3.42 लाख रुपयांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल हस्तगत
गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या मार्गदर्शनात स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस पथक जिल्ह्यातील विविध पो.स्टे. ला दाखल असलेल्या चोरी, घरफोडी मोटर सायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती काढून शोध घेण्यात येत होता आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातर्फे जिल्ह्यातील विविध दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास, गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धतीबाबत तांत्रीक दृष्ट्या विश्लेषण करण्यात येवून गुन्हेगारांचा मागोवा घेण्यात येत होता. विविध गुन्ह्याच्या तपासा दरम्यान गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण माहिती वरुन सराईत गुन्हेगार प्रविण अशोक डेकाटे (28) रा. तिलकवाडी मोहाडी, जिल्हा भंडारा याने गोंदिया जिल्ह्यात बऱ्याच मोठ्या प्रमाणात चोऱ्या, घरफोड्या, केल्या असल्याची खात्रीशिर माहिती प्राप्त झाल्याने सदर गुन्हेगारांची संपुर्ण माहिती काढून त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून 3-11- 2023 रोजी गुप्त माहिती वरुन रेल्वे स्टेशन गोंदिया येथुन जेरबंद करण्यात आले.
जेरबंद करण्यात आलेल्या नमूद सराईत गुन्हेगारास विश्वासात घेऊन गोंदिया जिल्ह्यातील चोरी, घरफोडी दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता. त्याने गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणें- केशोरी, नवेगावबांध, आमगाव हद्दित 8 ठिकाणी चोऱ्या घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. नमूद सराईत गुन्हेगार यांनी आणखी जिल्ह्यात चोऱ्या, घरफोड्या केल्याची शक्यता आहे. आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उघडकीस आलेले गुन्हे
1)अप. क्र. 375/23 कलम 454, 380 भादंवि.
2)अप. क्र. 376/23 कलम 454, 380 भादंवि.
3)अप. क्र. 377/23 कलम 454, 380 भादंवि.
4)अप. क्र. 176/23 कलम 454, 380 भादंवि.
5)अप. क्र.378/23 कलम 454, 380,511 भादंवि.
6)अप. क्र. 101/23 कलम 380 भादंवि.
7)अप. क्र. 70/23 कलम 457, 380 भादंवि.
8) अप. क्र. 102/23 कलम 454, 380 भादंवि.
गुन्ह्यांतील एकूण हस्तगत मुद्देमाल
60.05 ग्रॅम पिवळे धातू चे दागिणे, 30 ग्रॅम चांदी, रोख रक्कम 6 हजार रुपये, एक मोबाईल हँडसेट कि.4 हजार रुपये असा एकूण 3 लाख, 42 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून पो.ठाणे आमगाव गुन्ह्यात सुपूर्द करण्यात आले आहे.