स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दोन्ही गुन्ह्यातील 11,700 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस ठाणे गोंदिया शहर, ग्रामीण, रामनगर परिसरात गुन्हेगारांचा शोध व गुन्हे प्रतिबंधक गस्त करीत असतांना पथकातील पोलीस अंमलदार यांना रात्री 20.00 वा. दरम्यान गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक खबर मिळाली की सोन्या- चांदीचे दागिने विक्री करिता दोन इसम सराफा मार्केट इथे फिरत आहेत अशा प्राप्त खात्रीशीर माहिती वरून पोलीस पथकाने सापळा रचून सराफा मार्केट येथे दागिणे विक्रीकरीता फिरणाऱ्या श्रीकांत उर्फ नेहाल भगवानदास भिवगडे 19 वर्ष राहणार सुंदर नगर , गोंदिया, विधि संघर्ष बालक वय 16 वर्षे राहणार भीम नगर, राधाकृष्ण वॉर्ड, गोंदिया अश्या दोघा इसमांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यांत घेतलेल्या ईसम क्रमांक 1 याची पंचा समक्ष आणि विधिसंघर्ष बालक याची त्याचे पालक यांचे समक्ष अंगझडती घेतली असता क्रमांक 1 याचे पँटचे खिशातून एक पिवळ्या धातूचा मंगळसूत्र पदकासह किंमती अंदाजे 2000 रुपये, एक जोड पिवळ्या धातूचे झुमके किंमती अंदाजे 2000 रुपये, नगदी 7,700 रूपये असा एकूण 11, 700 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला.
दोघांचे अंगझडतीत मिळून आलेल्या मुद्देमाल बाबत विश्वासात घेवून सखोल विचारपुस केली असता दोघांनी मिळून दिनांक 04. 04. 2023 रोजी रात्र दरम्यान राधा कृष्ण वॉर्ड जुनी वस्ती तिरोडा येथील एका बंद घराचे सलाखिने कुलूप तोडून गादीखाली ठेवलेले 6000 रूपये चोरी केल्याचे तसेच दिनांक 05. 04. 2023 रोजी दुसरी चोरी-घरफोडी मटण मार्केट जवळील शहीद मिश्रा वॉर्ड मध्ये असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून त्यातून एक पिवळ्या धातूचा मंगळसूत्र पदकासह, एक जोड पिवळ्या धातूचे झुमके आणि नगदी 13,000 रूपये व गल्ल्यातील 2000 असा मुद्देमाल चोरी केल्याचे कबूल केले आहे. वरील नमूद प्रमाणे दोन्हीं चोरी,घरफोडी चे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने ताब्यांत घेण्यात आलेल्या दोघांकडून एकूण किमती 11, 700 रूपयांचा मुद्देमाल पोलीस ठाणे तिरोडा येथील दाखल गुन्हा क्र 227/2023 कलम 457, 380 भा.दं.वि. आणि गुन्हा क्र. 228/2023 कलम 457, 380 भा.दं. वि. अश्या दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्याचे अनुषंगाने जप्त करण्यात आलेला आहे. विधीसंघर्ष बालक यास त्याचे वडील(पालक) यांचे ताब्यांत सूचनापत्र देवून सोडण्यात आले आहे तर आरोपी श्रीकांत उर्फ नेहाल भगवानदास भिवगडे 19 वर्ष राहणार सुंदर नगर , गोंदिया यास पुढील कायदेशीर कारवाई करीता पोलीस ठाणे तिरोडा पोलीसांचे स्वाधिन करण्यात आले आहे. सदरची कामगीरी मा. श्री . निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, कॅम्प देवरी, पो.नि.श्री. दिनेश लबडे, स्था. गु. शा. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक पोलीस उप निरीक्षक श्री. महेश विघ्ने पो. हवा. राजु मिश्रा, महेश मेहर, भूवनलाल देशमुख, चापोहवा लक्ष्मण बंजार पो.शि. संतोष केदार यांनी उत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे.