गोंदिया : गेल्या चार वर्षापासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला मिळालेल्या माहितीच्या आधारे गोंदिया शहर पोलिसांनी अटक केली आहे.अटक केलेल्या आरोपीचे नाव खन्नाकुमार राजकुमार कुमार, वय 30,रा. दसखोली, गोंदिया असे असून याचे विरुद्ध पो.ठाणे गोंदिया शहर येथे अप.क्र.343/2017 कलम 399,402,352, 323 भादंवि सहकलम 4, 25 भा. हत्यार कायदा, सहकलम 65 (ख) खंड (ड) म.दा.का. सेशन केस क्रमांक 67/2017 मध्ये गुन्हा नोंदवला गेला आहे.सोबतच अप.क्र. 224/2014 कलम 376 (ड) भा.द.वि. सहकलम 4, 5(एल), 6 बाल लेंगीक अत्याचार प्रतीबंधक कायदा 2012 मध्ये केस क्र.16/2015 व अप. क्र. 216/2016 कलम 457, 380, 34 भा.दं.वि. केस क्रमांक 21/2017 अन्वये न्यायालयात खटले सुरु आहेत.
नमूद आरोपी हा न्यायालयात पेशी तारखे वर हजर होत नसल्याने न्यायालयाने त्याचे विरुद्ध पकड़ वारंट काढुन पो. स्टे, गोंदिया शहर येथे तामीलीस पाठविले होते. वारंट मधिल आरोपी हा मागील 4 वर्षापासुन फरार असुन मिळुन येत नव्हता, या अनुषगाने पोलीसांनी गुप्त यंत्रणेच्या मार्फतीने खात्रीशीर माहिती मिळाली की, तो जगदलपुर, छत्तीसगढ़ राज्य येथे आपले नाव बदलवून राहत आहे.प्राप्त माहितीवरून त्यास अटक करण्यास गुन्हे प्रकटीकरण पथक यांना जगदलपुर, जिल्हा बस्तर, राज्य छत्तीसगढ येथे पाठविण्यात आले होते. पोलीस पथकाने अथक परीश्रम घेवून फरार आरोपी नामे खन्नाकुमार राजकुमार कुमार, वय 30, रा. दसखोली, गोंदिया यांचा शोध घेतला असता तो राजेन्द्र राजकुमार कुमार अशा नावाने राहत असल्याचे माहिती वरुन त्यास ताब्यात घेवून पो. स्टेशन गोंदिया शहर येथे दिनांक 28/04/2023 रोजी आणण्यात आले. खन्नाकुमार राजकुमार कुमार रा. दसखोली, गोशाला वार्ड गोंदिया याचे विरुध्द मुख्य न्यायदंडा धिकारी, न्यायालय गोंदिया येथे खटला सुरु असुन तो जामीनावर/ बंधपत्रावर मुक्त आहे. सदर इसमाने वाजवी कारणाशिवाय जामीनाच्या/बंधपत्राच्या शर्तीनुसार मा. मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय गोंदिया समक्ष पेशी तारखेवर उपस्थित राहण्यास कसूर केल्याने आरोपीविरुध्द अप. क्र. 280/2023 कलम 229 (अ) भादंवि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.नमूद आरोपीस न्यायालयासमक्ष हजर करण्यात आले असता. न्यायालयाने आरोपीची भंडारा कारागृहात रवानगी केली आहे.पोलीस पथकातील पो.हवा सुदेश टेंभरे ,कवल पालसिंग भाटीया, पो.शि. कुणाल बारेवार, मुकेश रावते यांनी परिश्रपूर्वक आरोपीस अटक करण्याची कामगिरी केलेली आहे.पोलीस अधिक्षक निखील पिंगळे,अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल ताजणे,पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे.
चार वर्षापासून फरार सराईत गुन्हेगारास गोंदिया शहर पोलिसांनी केली अटक
RELATED ARTICLES