आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेन्द्राचे शुभारंभ
गोंदिया. आमदार सहषराम कोरोटे यांच्या प्रयत्न व पुढाकाराने मंजूर झालेले देवरी तालुक्यातील चिचगड येथील आयुष्यमान आरोग्यवर्धिनी उपकेन्द्राचे लोकार्पण सोहळा आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून मंगळवार (ता.१५ आगस्ट) रोजी उत्साहात पार पडले.
याप्रसंगी उपस्थित देवरी पं.स.च्या सभापती अंबिकाताई बंजार, चिचगड क्षेत्राचे जि.प.सदस्य धरमगुडेताई, पं.स. सदस्य श्री कासम, चिचगडचे सरपंच भाग्यश्रीताई भोयर, माजी सरपंच अर्चनाताई नरवरे, रा.कां.चे तालुकाध्यक्ष सी. के. बिसेन, पिपरखारीचे सरपंच जसवंताताई भारद्वज, वांढराचे सरपंच रेवन्ताताई अत्तरगडे, भागीचे सरपंच पुष्पाताई राऊत, कांग्रेस पक्षाचे तालुका महासचिव बळीराम कोटवार, आदिवासी संस्थेचे उपाध्यक्ष भुवन नरवरे, श्री धरमगुडे, चिचगडचे ग्रा.पं.सदस्य गीताताई भोयर, निशाताई परिहार, पोलीस पाटील जगदीश नरवरे, मा.सुदाम भोयर यांच्यासह आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी,कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि गावकरी बहसंख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार सहषराम कोरोटे यांनी उपस्थित लोकांना आपले आरोग्य विषयी काळजी कशी घ्यावी या बद्दल मार्गदर्शन केले.
चिचगड येथे आमदार कोरोटे यांच्या हस्ते आरोग्यवर्धिनी उपकेन्द्राचे लोकार्पण
RELATED ARTICLES