गोरेगाव : 3 जानेवारी बुधवार ला सकाळी 11 वाजेच्या सुमारास जय संघर्ष वाहन मालक चालक संघटनेच्या वतीने गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव शहरातील ठाना चौकात काही वेळासाठी चक्काजामआंदोलन करण्यात आले.
केंद्र शासनाने वाहन चालकाविरुद्ध अपघात झाल्यानंतर दहा वर्ष शिक्षा व सात लाख रुपये दंडाची शासन परिपत्रकात जी तरतूद केली आहे. त्या आदेशाच्या विरोधात आज बुधवारी जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने शहरात चक्काजाम आंदोलन करीत शहरातील ठाणा चौक ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कार्तिक बिसेन विदर्भ मीडिया प्रमुख सुरेश गोंधर्य ,तालुका अध्यक्ष विजय बडगे यासह मोठ्या संख्येत जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्तेनी मोर्चीचे नेतृत्व केले. शहरातील वाहन चालकांच्या विविध संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या ठाना चौकातून निघालेल्या मोर्चाची शहरातील तहसील कार्यालयात समारोप करण्यात आले यावेळी तहसीलदार पैकी बदाने गोरेगाव यांना वाहन चालकांचा काळा कायदा मागे घेण्यात यावा वाहन चालकांसाठी विशेष तरतूद कायद्यात करण्यात यावी आधी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चात राजेश ठाकरे हर्षद शेख राजेश गोंधळी शिशुपाल वालदे शैलेश बरीयेकर सादिल कुरेशी प्रीतीलाल बिसेन आदी उपस्थित होते.
जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेच्यावतीने गोरेगाव शहरातील ठाणा चौकात चक्काजाम आंदोलन
RELATED ARTICLES