जानेवारी महिन्यात महानाट्य व महासंस्कृती आयोजनाची मेजवानी

0
175

जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली समिती
गोंदिया : गोंदियाच्या सांस्कृतिक वैभवाला उंचीवर नेणाऱ्या दोन मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी जिल्हावासियांना जानेवारी महिन्यात मिळणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत एक महानाट्य व महासंस्कृती मेळाव्याचे आयोजन होत असून जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती गठीत करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे स्थळ व तारीख लवकरच निश्चित करण्यात येणार येईल.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीत सदस्य सचिव म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे  व जिल्हा समन्वयक म्हणून उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील काम पाहणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, सहाय्यक संचालक सांस्कृतिक कार्य नागपूर संदीप शेंडे, मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. महेंद्र गजभिये, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कादर शेख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम नरेंद्र लभाने, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग येसनसुरे, कार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी आनंद जैन, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, तहसीलदार समशेर पठाण व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे हे समितीचे सदस्य असणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here