गोंदिया : पुढील कालावधीत उष्णलाटांचे व त्यानंतर मान्सून कालावधी सुरू होणार असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यात मंत्रालयाकडून प्राप्त 02 नग एअर टेंटचे प्रात्यक्षिक करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनामध्ये कार्य करताना सदर टेंट अतिशय उपयोगी असल्यामुळे सदर टेंटचा वापर कसा करावा व टेन्ट तयार करण्याचे प्रात्यक्षिक जिल्हाधिकारी प्रजित नायर, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर व उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखविण्यात आले. उपस्थितांनी यावेळेस सदर टेंट व फायर ब्लॅंकेट बाबत संपूर्ण माहिती घेतली.
उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना आग लागून जीवित व वित्तहानी होऊ नये याकरिता फायर ब्लॅंकेटचा वापर आपत्तीच्या वेळेस आग लागल्यास कसा करावा याबाबत देखील उपस्थितांना प्रशिक्षण देण्यात आले. सदर प्रशिक्षण संस्थेचे जनरल मॅनेजर जितेंद्र कोचर, अजितकुमार पांडे व मंगेश गाडे यांच्या माध्यमातून देण्यात आले. यावेळी अग्निशमन अधिकारी नीरज काळे, भारती सामाजिक सेवा संस्थेचे सचिव जयंत शुक्ला, शोध व बचाव पथक प्रमुख नरेश उईके, आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभागाची चमू व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे प्रात्यक्षिक
RELATED ARTICLES